My best friend essay in marathi
Answers
ये दोस्ती हम नाही छोडेगे|तोडेगे दम मगरतेरा साथ ना छोडेगे.! पूर्वीच्या सिनेमामध्ये दोस्तीवर खूप गाणी असायची आणि गोष्टी पण दोस्तीवर आधारलेल्या असायच्या. त्यामुळे आम्हाला पण वाटायचे की आपली पण अशीच दोस्ती व्हावी कोणाबरोबर तरी. तसे माझे खूप मित्र आहेत पण आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो. त्यामुळे एक ग्रुप असा तयार झाला आहे. आम्ही सगळे एकटे किंवा एखादा भाऊ किंवा बहीण असलेले आहोत. आमची कॉलनी मध्ये सगळी न्यूक्लियर कुटुंबे आहेत. त्यामुळे आम्हाला एकत्र कुटुंबातील काहीच मजा माहीत नाही. आम्ही काहीतरी सनसनाटी घडावे अशी वाट बघत होतो. तेव्हड्यात त्याचे आमच्या शाळेत पदार्पण झाले. आम्हाला खुपच आनंद झाला .चला! आता ह्याची फिरकी घ्यायची. पण त्यानेच आमची तोंडे उघडीच राहतील असे पदार्पण केले. मला अजून आठवतो आहे त्याचा आमच्या शाळेतील पहिला दिवस! कडक गणवेष, व्यवस्थित भांग पाडलेले केस नीट नेटके व्यवस्त्थित दप्तर, पॉलिश केलेले बूट आणि ताठ बांधा. आम्ही सगळे जण त्याच्याकडे बघतच बसलो. शिक्षकांनी ओळख करून दिली, “हा राहुल जोशी. आजपासून तो आपल्या शाळेत शिकणार आहे.हा कर्नल राधेय जोशींचा मुलगा आहे” आम्ही सगळेजण खूप खुश झालो.कारण राधेय जोशी आमच्या गावाचे भूषण आहेत. त्यांचा मुलगा आमच्या शाळेत खेळात पुढे जायचे म्हणून आला. शिक्षकांनी त्याला माझ्या जवळच बसायला सांगितले. आमची ओळख झाली आणि त्या दिवसापासून आम्ही दोघे जिवलग मित्र बनलो. आमच्यात काहीही कॉमन नव्हते. तरीही आम्ही जोडगोळी म्हणून ओळखले जाऊ लागलो. कदाचित विरुध्द्ध चुंबक एकमेकांना आकर्षित करतात हाच नियम इथेही लागू झाला असावा. तो उंच ,मी साधारण उंचीचा. तो सडपातळ मी गुटगुटीत. तो गोरा, मी निमगोरा. तो व्यवस्थित, मी गबाळा. आमचे एकमेकांशी तरीही छान पटायचे. कारण तो सांगायचा आणि मी फक्त त्याचे ऐकायचो. त्याच्याकडून खूप काही शिकता यायचे. कारण तो खूप हुशार होता. तो यायच्या आधी माझा पहिला नंबर असायचा. आता त्याचा आणि माझा विभागून पहिला नंबर येतो. तथापि त्याचे आणि माझे आवडते विषय वेगवेगळे आहेत. तो गणितात आणि इतिहास भूगोल तसेच संस्कृत मध्ये पैकी च्या पैकी गुण मिळवतो, आणि मला सायन्स आणि भाषांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतात. त्यामुळे आम्ही एकमेकांना न येणारे विषय शिकवतो.