My brother . write composition in marathi
Answers
Answer:
माझ्या भावाचे नाव सतीश आहे.माझा दादा माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे.तो एका आईटी कंपनीमध्ये सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून काम करतो.
रोज सकाळी उठल्यावर तो व्यायामशाळेत जातो.त्यानंतर तो कामाला जातो. कामावरुन आल्यावर तो माझ्याशी गप्पा मारतो.मी त्याला माझ्या कॉलेजमधील गमती सांगते.कधी कधी तो माझ्यासाठी कामावरुन येताना खाऊ आणतो.त्याच्याकडे एखादी वस्तू मागितली की,तो ती मला हमखास देतो.
तो मला अभ्यासातदेखील मदत करतो.कठीण कठीण गणिते तो पटकन सोडवतो.माझ्या दादाला सिनेमा पाहायला फार आवडते.एखादा नवीन सिनेमा आला,की तो सिनेमा पाहायला मला घेऊन चित्रपटगृहात जातो.
कधी काधी तो माझी टिंगल करतो,पण तितकेच माझे लाडसुद्धा करतो. मी चूक केल्यावर तो माझ्यावर रागावतो,पण तो तितकाच प्रेमळ देखील आहे.कधी कधी कामानिमित्त त्याला बाहेर जावे लागते,तेव्हा मला त्याची खूप आठवण येते.
असा हा माझा दादा मला खूप खूप आवडतो.