India Languages, asked by nandanikumari9846, 6 days ago

My collage essay in marathi

Answers

Answered by roysreyasi36
0

Answer:

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध | my first day in college essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध बघणार आहोत. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना ती कठीण जाणवत असते हीच स्थिती कॉलेजच्या पहिल्या दिवशी होत असते. दहावी संपल्यानंतर अकरावीत जाताना मनात अनेक प्रश्न असतात. मन गोंधळलेले असते. पण या प्रश्नांची उत्तरे आपले गुरुजन देत असतात अश्या या मार्गदर्शक गुरुजींना अभिवादन करूया आणि सुरुवात करूया निबंधाला.

प्राथमिक शाळेतून मी माध्यमिक शाळेत गेलो. आणि काय झाले कोण जाणे! मला शाळा आवडू लागली. म्हणजेच शाळेचा अभ्यास मला खूप प्रिय झाला. झपाटल्याप्रमाणे मी अभ्यास आणि अभ्यासेतर कार्यक्रमात बुडून गेलो. त्यामुळेच ती मंतरलेली सहा वर्षे कशी, केव्हा संपली, ते कळलेच नाही. दहावीचे वर्ष संपताना मीही पुढील शिक्षणाचे बेत आखत होतो.

दहा वर्षे शिक्षण घेऊन आज अकरावीत जाताना छातीत धडधडत होते. कारण महाविदयालयातील नवीन वातावरण! त्या वातावरणात मी घाबरलो होतो ; पण उसने अवसान आणून धिटाई दाखवत होतो. सूचनाफलकांपाशी विदयार्थ्यांनी खूप गर्दी केली होती. पण त्या गर्दीत घुसून आम्हांला आमची तुकडी आणि वर्ग-खोली कोणती हे पाहावेच लागले. गंमत म्हणून महाविदयालयात फेरफटका मारला. आमचा वर्ग पाहून आम्ही आश्चर्यात पडलो

Similar questions