India Languages, asked by noopur13, 1 year ago

My Country Essay in Marathi, Maza Bharat Desh Nibandh, My India​

Answers

Answered by kushal1845
7

Explanation:

भारत माझा देश आहे . माझा देश प्राचीन व महान आहे.

माझ्या देशाच्या उत्तरेला हिमालय आहे . माझ्या देशाला लांबलचक समुद्रकिनारा लाभला आहे. माझ्या देशात खूप नद्या आहेत. गंगा,यमुना, यांसारख्या मोठमोठ्या नद्यांमुळे माझा देश संपन्न झाला आहे .

माझ्या देशातील बहुसंख्य लोक शेतकरी आहेत . ते सर्व खेड्यामध्ये राहतात . दिल्ली, मुंबई यांसारखी अनेक महानगरे माझ्या देशात आहेत . या शहरामध्ये मोठमोठे उदयोग आहेत .

माझ्या देशात अनेक खेळाडू , कलावंत , शास्त्रज्ञ निर्माण झाले आहेत . त्यांनी भारताची कीर्ती जगभर पसरवली आहे. माझ्या देशात भिन्न भिन्न धर्माचे लोक राहतात; तरीही आम्ही सर्व भारतीय एक आहोत . तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे .

माझा भारत देश हा थोर व पुण्यवान माणसांचा देश आहे. माझा देश मला खूप आवडतो .

Similar questions