My favorite book essay in marathi
Answers
Answer:
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे आमच्या ब्लॉगवर. आज आपण माझे आवडते पुस्तक निबंध मराठी बघणार आहोत. या निबंधामध्ये लेखकाने आपल्या आवडत्या पुस्तकाचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
माझे आवडते पुस्तक निबंध मराठी लिहीताना आठवण येते ती उन्हाळ्याच्या सुट्टीची, दरवर्षी वर्षी सुट्टी लागली की मी माझ्या आवडत्या छंदाचे लाड पुरवून घेतो. म्हणजे मी 'ग्रंथालयाचा सभासद' होतो आणि मनसोक्तपणे पुस्तके वाचून काढतो. सुट्टीतील माझ्या या अवांतर वाचनावर कुणाचा आक्षेप नसतो.
उलट आई कौतुकाने सांगते, “आमच्या बाळ्याचा सुट्टीत काही त्रास नसतो. तो आणि त्याची पुस्तके." खरोखर पुस्तके असली की वेळ कसा जातो ते कळतही नाही. या वर्षी मी अनेक पुस्तके वाचली. या सर्व पुस्तकांत एका पुस्तकाने माझ्या मनात कायमचे स्थान मिळविले आहे. ते पुस्तक आहे गोदावरी परुळेकर यांचे 'जेव्हा माणूस जागा होतो ."
या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला होता, म्हणून ते वाचावयाचे असे मी ठरविले होते पण ग्रंथालयात मला त्या पुस्तकासाठी क्रमांक लावून काही दिवस थांबावे लागले. जेव्हा ते पुस्तक घेऊन मी घरी आलो आणि वाचावयास सुरुवात केली तेव्हा त्या पुस्तकाचे शेवटचे पान वाचल्यानंतरच मी ते खाली ठेवले. नंतरही दोन वेळा मी ते पुस्तक वाचले.
जेव्हा माणूस जागा होतो...' ही काही एखादी कादंबरी नाही, किंवा काव्यसंग्रहही नाही. तरी देखील ते पुस्तक आपल्या मनाला भिडते. कारण ती एक सत्यकथा आहे. एका वसाहतीची ती हृदयस्पर्शी कहाणी आहे. या पुस्तकाची लेखिका प्रस्तावनेतच सागून टाकते की, ती काही स्वतः नाणावलेली लेखिका नाही. तरी पण हे पुस्तक उत्कृष्ट उतरले आहे. कारण त्या कादंबरीतील क्षणन् क्षण लेखिका स्वतः जगली आहे.
लेखिका गोदावरी परुळेकर यांचे बालपण व शिक्षण पुण्यात पार पडले. पण कॉ. परुळेकरांबरोबर राजकीय-सामाजिक कार्य करताना त्यांना या डोंगरकपारीतील आदिवासींची व्यथा जाणवली; त्यांची गुलामावस्था पाहिली म्हणून त्यांनी त्यांच्यातील माणूस जागा केला. या आपल्या साऱ्या कामगिरीचा वृत्तान्त त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे-अगदी साध्या, सोप्या, रसाळ भाषेत.
आदिवासींचे जीवन किती कष्टप्रद आहे, हे सांगताना त्यांनी कोंड्याची भाकर व अंबाडीच्या भाजीचे केलेले वर्णन आपल्याला खूप काही सांगून जाते. चहा कसा करतात हेही त्या वारल्यांना माहीत नव्हते. 'लग्नगडी' व 'वेठीच्या आसा'चा फेरा या परंपरागत रूढी म्हणजे जमीनदारांच्या निपुणतेचा पुरावाच आहे. लेखिकेला पहिले काम करायचे होते ते आदिवासींच्या मनातील दुबळेपणा काढून टाकायचे. वर्षानुवर्षांचा जुलमी छळ अंगवळणी पडल्यामुळे ते दुबळे झाले होते;
त्यांचा आत्मविश्वास हरवला होता. लेखिकेने त्यासाठी त्यांना संघटित केले. त्यांच्यातील आत्मविश्वास फुलविला. पुस्तकाच्या अखेरीस हाच आदिवासी ‘खऱ्या अर्थाने माणूस' होऊन जमीनदारांच्या विरुद्ध बंड करावयास उभा ठाकलेला आपल्याला दिसतो.
या पुस्तकाची विशेषता मला जाणवली ती अशी की, समाजातील हा प्रश्न इतका महत्त्वाचा असूनही समाजातील बहुसंख्यांना त्याची काही माहितीही नव्हती. आदिवासींची पिळवणूक चालते असे आम्ही ऐकतो, बोलतो; पण ही पिळवणूक किती अमानुष रीतीने चालते, कशी चालते याची खरीखरी कल्पना हे पुस्तक आपल्याला आणून देते. आदिवासी हा अशिक्षित आहे.
अंधश्रद्धेत गुरफटलेला आहे असे आपण मानतो; पण त्याच्या मनातील माणूसही मोठा आहे हेही आपल्याला येथे दिसते. पकडवॉरन्ट असलेली गोदामाई त्यांच्या घरी आली तेव्हा तिला पोहोचविण्यासाठी या आदिवासींनी आपल्या प्राणांची बाजी लावली. कधी त्यांनी तिला आपली 'म्हातारी माय' मानली; तर कधी तिला आपली 'माहेरवाशीण' बनविली
जेव्हा माणूस जागा होतो...' या पुस्तकाला बक्षीस देऊन सरकारने एका परीने लेखिकेचाच यथोचित गौरव केला आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे. आणि म्हणूनच ते माझे विशेष आवडते आहे.
पुस्तके उत्कृष्ट मित्र आहेत. ते तुमची बाजू कधीच सोडत नाहीत. मला पुस्तके वाचणे आवडते.पुस्तकांमध्ये लोकांना त्यांचे घर सोडण्याची आवश्यकता न घेता जगभरातील लोकांना हलवण्याची क्षमता आहे. पुस्तके आपल्या सर्जनशीलतेच्या विकासासाठी देखील मदत करतात. माझे पालक आणि शिक्षक माझ्यामध्ये वाचनाची सवय विकसित करतात. त्यांनी मला वाचनाचे महत्त्व पटवून दिले. मी खूप पुस्तके वाचली आहेत. पण माझे आवडते हॅरी पॉटर आहे. या पुस्तकाचे लेखक जे.के. रोलिंग. ही पुस्तके जादूगार जगाबद्दल आहेत. हॅरी पॉटर मालिकेत सात पुस्तके आहेत. जादूगार दगड हे मालिकेतील माझे आवडते पुस्तक आहे.
मी वाचलेल्या सर्वात आकर्षक आणि रोमांचक पुस्तकांपैकी हे एक आहे. मी मालिकेतील सर्व पुस्तके वाचली आहेत आणि त्यापैकी कोणीही मला या पुस्तकाइतकी पकडली नाही. मी त्यांना वारंवार वाचले कारण ते मला कधीही कंटाळले नाहीत.