India Languages, asked by person1303, 9 months ago

My favourite garden essay in Marathi

Answers

Answered by shobhakabra502
0

Answer:

आंबा, फणस, चिक्कू, सीताफळ, केळी, नारळ, पपई,जांभूळ, चिंच, शेवगा, गुलाब, शेवंती, मोगरा, रात्र-राणी, जाई, जुई, तुळस, पुदिना, कढििलब, अळू, लिंब, संत्री, गोकर्ण, अनंत अशा अस्सल मुंबईच्या झाडांची माझ्या बागेतली हजेरी वेळोवेळी मला मनाने मुंबईला घेऊन जातात. कितीतरी फळांच्या चवी, फुलांचे सुवास वेगवेगळ्या ठिकाणांच्या आठवणी चाळवतात.

मी राहते त्या साउथ फ्लॉरिडात पाऊस खूप पडतो. थंडी माणसांना आणि पशू-पक्षी, वृक्ष-वल्लरी सर्वाना हवीहवीशी वाटावी इतपतच. उन्हाळा तसा बेताचा. समुद्राचं सान्निध्य आणि मुंबईची आठवण करून देणारं हे हवामान माझी बागकामाची आवड जोपासायला मदतच करतं. आंबा, फणस, चिक्कू, सीताफळ, केळी, नारळ, पपई,जांभूळ, चिंच, शेवगा, गुलाब, शेवंती, मोगरा, रात्र-राणी, जाई, जुई, तुळस, पुदिना, कढििलब, अळू, िलब, संत्री, गोकर्ण, अनंत अशा अस्सल मुंबईच्या झाडांची माझ्या बागेतली हजेरी वेळोवेळी मला मनाने मुंबईला घेऊन जाते. कितीतरी फळांच्या चवी, फुलांचे सुवास वेगवेगळ्या ठिकाणांच्या आठवणी चाळवतात. पावसाळ्यात अनंत फुलला की शाळेचे दिवस, मत्रिणीच्या बागेतली डबल अनंताची झाडं आठवतात. कधी कधी संध्याकाळी जरा उशिरा बाहेर फिरायला गेलं, की एखाद्या घराच्या बागेतल्या रातराणीचा गंध मला शाळा-कॉलेजच्या दिवसांत सुट्टीमधल्या महाबळेश्वरच्या ट्रिपची आठवण करून देतो. माझी मत्रीण राहते त्या कॉम्प्लेक्समध्ये तिच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप शेवग्याची झाडं लावलेली आहेत. झाडांवर येणाऱ्या शेंगांकडे कोणी ढुंकूनही बघत असतील, असं वाटत नाही. मला माझ्या आत्याचं घर आठवतं. तिच्या अंगणात शेवग्याचं झाड होतं. घरच्या शेंगांचा खाऊ तिच्याकडून कितीतरी नातेवाईकांना जात असे. माझ्या मागच्या दारी आंब्याची दोन झाडं आहेत. एक आहे हेडन या जातीचं आणि दुसरं आहे केंट. हेडन आंबा बराच आपल्या हापूसच्या जवळचा. फळ फार मोठं नाही. कोय लहान, धागे अजिबात नाहीत. हे झाड माझ्याकडे आलं त्याची गमतीदार गोष्ट आहे. माझ्याकडे तोपर्यंत एकही आंब्याचं झाड नव्हतं. बाहेर फिरायला गेले असताना एका घराच्या पुढच्या आवारात कैऱ्यांनी लगडलेली दोन झाडं होती. आम्ही मालकाला थोडय़ा कैऱ्या तोडायची परवानगी विचारायच्या उद्देशाने दार ठोठावलं. मालक अब्दुल्लांनी दार उघडलं आणि आम्हाला आत बोलावलं. त्यांचे पूर्वज भारतातून जमेकाला गेलेले असल्याने त्यांना भारतीय लोकांबद्दल बराच जिव्हाळा होता. आम्ही कैऱ्या तोडायची परवानगी मागितल्यावर त्यानी कैऱ्या तर दिल्याच आणि पलंगाखाली असलेल्या आंब्यांच्या राशीतून तयार आंबेही दिले. त्यांच्या मागच्या, पुढच्या अंगणात मिळून ७-८ आंब्यांची वेगवेगळ्या जातींची झाडं होती. झाडांना फळं येण्याचा मोसम थोडाथोडा वेगळा असल्यानी काही झाडांवरचे आंबे उतरवून झाले होते आणि काही अजून तयार होत होते. अब्दुल्ला म्हणाले, ‘‘तुम्हाला आंब्याचं झाड तुमच्या बागेत लावायचं आहे का? माझ्या घराच्या बाजूला रिकामी जागा आहे, तिथे मी दुसरं घर बांधणार आहे. तिथे असलेली दोन आंब्याची झाडं मला काढावी लागणार आहेत. तुम्ही हवं असलं तर एक घ्या. एक माझा मित्र घेणार आहे. मला झाडाचे पस नकोत, मात्र झाड घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची.’’ अब्दुल्लांच्या मदतीने मग एका कंपनीला आम्ही ते काम दिलं. झाडाचे आंबे उतरवून झाल्यावर झाड सर्व बाजूंनी छाटलं आणि झाडाच्या भोवती मोठा खड्डा खणून झाडाचा रूटबॉल मोकळा करून त्याला पाणी देत तो मजबूत केला. हे सगळं एक महिनाभर चाललं. मग आमच्या मागच्या आवारात एक भला थोरला खड्डा खणला गेला. माझं घर तळ्याच्या काठावर आहे. खड्डा तळ्याच्या बाजूलाच होता. एक दिवस सकाळी झाड नव्या घरी आणलं. पावसाळ्याचे दिवस होते. आमच्याकडे वादळं रोजचीच. सकाळपासून दुपापर्यंत भरपूर ऊन तापतं आणि दुपारी वादळी पाऊस. वादळ एकदोन तासात हवेत आणि शीतल गारवा मागे ठेवून दुसऱ्या दिवशी परत येण्याची हमी देऊन जातं. आम्ही सकाळी झाड लावलं आणि आंब्यांची स्वप्नं रंगवीत बसलो, तर दोन-तीन दिवसांत जरा मोठं वादळ आलं. हे वादळ आमच्या आंब्याला पेललं नाही. आमचं झाड तळ्याच्या पाण्यात सपशेल आडवं झालं होतं. ज्या कंपनीने झाड लावलं होतं त्यांना आम्ही परत बोलावलं. या वेळी झाड परत उभं करून त्याला तीन टेकू दिले. हे टेकू चांगले वर्षभर होते मग. पुढच्या मोसमात झाड अजून वाढत असल्याने आंबे आले नाहीत. नंतरच्या वर्षी मात्र जानेवारी सरता सरता झाड मोहरायला लागलं. जूनच्या सुमाराला आंबे उतरवता आले. आता दर वर्षी झाड आम्हाला सुंदर फळं देतं. या झाडाचा आकार अगदी हापूसच्या झाडासारखा (गोल, डेरेदार) आहे असं मी ऐकलं आहे. आम्ही एका आंब्याच्या झाडांच्या प्रदर्शनाला गेलो होतो. साउथ फ्लॉरिडाच्या प्रसिद्ध केंट जातीच्या झाडाची एक कुंडी आम्ही त्या छोटय़ाशा झाडावर लटकणाऱ्या कैऱ्या बघून विकत घेतली. तळ्याच्या बाजूलाच पहिल्या आंब्याच्या शेजारी हे झाड लावलं. झाडाने दोन वर्षांतच आंबे द्यायला सुरुवात केली. हेडनसारखं हे झाड डेरेदार नाही. त्याचा पर्णसंभारही तसा कमीच. फळ खूपच मोठं. साधारण मध्यम आकाराच्या नारळाएवढा एक एक आंबा. यालाही मोहर साधारण फेब्रुवारीमध्ये येतो, पण फळं मात्र सप्टेंबरच्या मध्याला तयार होतात.

येणारे सगळे आंबे नातेवाईकांना आणि मित्रपरिवारांत वाटून घरात पिकलेल्या आंब्यांच्या मोरांब्याच्या बाटल्या फ्रीज करून मग झाडं थोडी छाटून पुढच्या मोसमाची वाट बघणं सुरू होतं. आंब्यांच्या आठवणी मुंबईकरांना नाहीत, हे शक्यच नाही. मला आठवतं ते आजोबांचं खेडय़ातलं घर. काकांचा उसाचा मळा, मळ्यातली कलमी आंब्याची झाडं, मळ्यातली झोपडी, आणि झोपडीत आत्याबरोबर केलेला आठवडाभराचा मुक्काम. रोज सकाळी जाऊन खाली पडलेला, तयार आंबे (एखाद्दुसराच असे) आणून खायचे. मोठय़ा घरी सगळ्या पोरांना छोटय़ा बिटक्या आंब्यांनी भरलेल्या टोपल्या असत. शहरातल्या घरात एक कोळीण कच्चे आंबे घेऊन येत असे. आई मग पेंढा घालून अढी घालत असे. कोळीण गेली तरी तिचं विडी ओढणं आमच्या लक्षात राहीलं.

Answered by divyakshipatil
0

बाग ही एक हिरवळ आणि सुंदर फुलांनी भरलेले ठिकाण आहे. जिथे प्रत्येक व्यक्तीला गेल्यावर त्याच्या मनाला शांती मिळते आणि मन प्रसन्न होत. बागेमध्ये सगळीकडे हिरवळ आणि सुंदर रंगबिरंगी फुले असतात.

ती सुंदर फुले बगायला खूप छान वाटते. तसेच उद्यान म्हणजेच बाग होय. ऐतिहासिक काळात खूप मोठमोठ्या बाग होत्या. त्या भरपूर लांब आणि रुंद होत्या. त्याकाळी कोणत्या न कोणत्या देवतांचे देवालय हे बागेत असायचे.

बागेमध्ये भव्य वृक्ष, तसेच फळा – फुलांनी भरलेली आणि वाकलेली झाडे पाहायला मिळतात. तसेच बागेमध्ये एखादा तलाव आणि त्यात विहार करणारे पक्षी आणि कमळांनी सुशोभित करणारी असते.

बरीच काही उद्याने हि भरपूर सुंदर असतात. त्या बागेतील रंगबिरंगी फुले हे सर्वाना आकर्षित करतात. तसेच लहान मुलांना खेळायला बागेमध्ये एक छोटेसे मैदान असते. बागांमध्ये झुले सुद्धा असतात. काही लोक हे सकाळ – संद्याकाळी बागेमध्ये फिरायला जातात.

बागेमध्ये जाऊन लहान – थोरांना खूप मजा वाटते. त्याच बरोबर त्या बागेमध्ये निसर्गाचे सौंदर्य पाहून मन खूप हलके होते. बागेतील फुलांचा सुगंध सगळीकडे पसरतो. त्यामुळे मन एकदम उत्साहित होते. असल्या प्रकारचे बाग मला खूप आवडतात.

Similar questions