My favourite toy remote control car in Marathi 5 line speech
Answers
*My favourite toy remote control car*
*माझे आवडते खेळणं रिमोट कंट्रोल गाडी*
लहानपणी प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपले जीवन आपल्या खेळण्यात रमलेले असते. खेळणी म्हणजे आपले जीव की प्राण. वाढदिवसाच्या दिवशी मी आतुरतेने माझे गिफ्ट उघडण्याची वाट बघायचो कारण माझे नातेवाईक मला खेळणी द्यायचे. अशाच माझ्या सहाव्या वाढदिवसाला मला माझ्या आई-बाबांनी रिमोट कंट्रोल कार भेट दिली. ती गाडी पिवळ्या रंगाची असून, ऑफ रोडर पद्धतीची होती. माझ्या बाबांनी रिमोट मध्ये सेल घातले आणि मी त्या गाडीने खेळायला सुरुवात केली. ती गाडी खुप वेगाने पळायची. तिचे टायर्स मोठे असल्यामुळे तिला वाळूत रेतीत व दगडांवर चालवायला मला खूप मजा यायची. अख्ख्या बिल्डिंगमध्ये अशी गाडी फक्त माझ्याकडेच होती आणि हे बघून बाकीचे माझे मित्र देखील त्यांच्या आई-बाबांकडे हट्ट करू लागले. ती गाडी म्हणजे माझा जीव की प्राण होती. एका तासात बॅटरी रिचार्ज झाली की लगेच मी तिला बिल्डींग खाली घेऊन जायचं, बॅटरी संपली की पुन्हा घरी येऊन चार्ज करायची. माझी उन्हाळ्याची सुट्टी अर्धी यातच गेली. कालांतराने तिच्या बॅटरी जुन्या होऊ लागल्या. आणि मी जेव्हा दहावीत गेलो तेव्हा ती गाडी बंद पडली. मला खूप वाईट वाटले. पण तिची आठवण माझ्या मनात अजूनही कायम आहे. आणि म्हणूनच मी ही गाडी बंद अवस्थेत का असेना शोकेसमध्ये ठेवली आहे.