India Languages, asked by AdityaBari11, 1 year ago

My india essay in marathi

Answers

Answered by yash9292
0
I don't know Marathi Verna I will do it
Answered by Anonymous
10
"माझा भारत"

माझा भारत देश मला खूप आवडतो. भारतात अनेक गोष्टींची विविधता आहे. कुठे उष्ण हवामान तर कुठे थंड हवामान. कुठे पाऊस अतिशय पडतो, तर कुठे अतिशय कमी पडतो. कुठे जमीन सुपीक आहे, तर कुठे खडकाळ. त्यामुळे या माझ्या देशात तर्‍हेतर्‍हेची पिके येतात. स्वातंत्र्यानंतर भारतीय शेतकऱ्यांनी देशात हरित क्रांती घडवून आणून देशाला धान्याबाबत स्वावलंबी बनवले आहे.

भारताची राष्ट्रभाषा हिंदी असली तरी भारतात विविध भाषा बोलल्या जातात. या सर्व भाषांतील वांग्मय समृद्ध आहे. भारत विविध धर्मांचे, पंथांचे, जातींचे लोक राहतात आणि ते एकमेकांच्या सणासमारंभात उत्साहाने भाग घेतात. भारत विविधता असली तरी त्या विविधतेत एकता आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्तीचा सर्व भारतीय एकत्र येऊन मुकाबला करतात.

भारताला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. अनेक थोर विचारवंत, साधुसंत त्यांचा हा देश आहे. प्राचीन काळापासून येथे ज्ञानसाधना चालू आहे. आधुनिक वैज्ञानिक युगाच्या स्पर्धेतही भारत मागे नाही.

असा हा भारत देश प्रगतिपथावर घोडदौड करत असताना काही अपप्रवृत्तीचे लोक या वेगाला खीळ घालण्याचा प्रयत्न करतात. भारतीयांच्यात भेदभाव निर्माण करून अस्थिरता निर्माण करू पाहतात. वसा घेतलेला माझा भारत देश कधीही त्यांच्यापुढे नमणार नाही.
Similar questions