India Languages, asked by mukulparmar5760, 10 months ago

My Maharashtra essay in Marathi for students of standard 8

Answers

Answered by madhurtamsetwar99
2

Answer:

मित्रांनो महाराष्ट्राच्या मराठी मातीचा इतिहास फार प्राचीन आहे. अनेक वीरांच्या बलिदानाने हा महाराष्ट्र बनलेला आहे. आज महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात जास्त उद्योगधंदे असलेले राज्य आहे आजच्या या लेखात आपण Maza maharashtra nibandh पाहणार आहोत. महाराष्ट्रातील मुंबई शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. माझा महाराष्ट्र ह्या मराठी निबंधापासून प्रेरणा घेऊन आपण आपल्या शाळेत सोप्या पद्धतीने मराठी निबंध लिहू शकतात.

1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तरीही यापूर्वीच महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला होता. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, जहाल मताचे प्रवर्तक लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक अनमोल रत्ने याच मातीत जन्माला आली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या सारख्या ज्ञानी संतांनी सुद्धा इथेच जन्म घेतला.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विक्रमादित्य सुनील गावस्कर, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी व अविरत समाजकार्य करणारे बाबा आमटे इत्यादी सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्यांनी आपल्या शौर्याने कर्तबगारीने महाराष्ट्राचे नाव जगात अजरामर केले.

माझा महाराष्ट्र डोंगरदऱ्यांनी, शिवबाच्या गड-किल्ल्यांनी सजला आहे. गोदावरी सारख्या मोठ्या नद्या अजिंठा-वेरूळ सारखी देखणी प्राचीन लेणी, विद्येचे माहेरघर पुणे, अमाप निसर्गसौंदर्याने नटलेला कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे.मुंबई महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी आहे. नागपुर ही महाराष्ट्राची उप राजधानी आहे. महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर उंच आहे. महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक तसेच क्षेत्रफळात तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे. ज्यामुळे राज्याला दरवर्षी देश-विदेशातून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. माझ्या महाराष्ट्राचे राज्य फूल ताम्हण तर राज्यफळ आंबा आहे.

मराठी भाषा महाराष्ट्राची समृद्ध भाषा, मायबोली आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तर राज्यपक्षी हरियाल आहे. गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील महत्वपूर्ण सण आहे. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात दहा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असा हा सर्वांगसुंदर महाराष्ट्र मला अत्यंत प्रिय आहे.

बहु असोत सुंदर संपन्न की महा |

प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा ||

महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. महा व राष्ट्र. या शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो महान राष्ट्र. महाराष्ट्र हा बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नवरोजी, वीर सावरकर, गोपाल कृष्ण गोखले इत्यादी महान नेत्यांची जन्मभूमी आहे. महाराष्ट्राला श्रीमंत व संपन्न राज्यांमध्ये शामिल केले जाते. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या सोबतच देशाची आर्थिक राजधानी देखील आहे. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात भारतातील सर्वात अग्रगण्य राज्य आहे. भारतातील एकूण उत्पादनाच्या जवळपास एक चतुर्थांश भाग महाराष्ट्रात तयार होतो.

याशिवाय महाराष्ट्र त्याची विशिष्ट भौगोलिक ओळख व सांस्कृतिक वारसेमुळे विशेष ओळखला जातो. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वत आहे. पश्चिमेला अरबी सागर स्थित आहे. महाराष्ट्रातील अधिकांश भागातील जागा बेसाल्ट खडकापासून निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वात उंच पर्वत कळसुबाई आहे या पर्वताची उंची 1646 मिटर आहे. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्या गोदावरी, कृष्णा, भीमा, नर्मदा, वैनगंगा, कोयना, पंचगंगा, मुळा मुठा इत्यादी आहेत

महाराष्ट्राचा इतिहास खूप जुना आहे. महाराष्ट्रात वर्तमान काळात 12 करोड पेक्षा जास्त लोक राहतात. महाराष्ट्र सभ्य प्रदेश म्हटले जाते. येथील जवळपास अर्धी लोकसंख्या शहरात राहते. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र संपन्न राज्य आहे. महाराष्ट्रात अनेक प्राचीन गुहा, वस्तुशिल्प व पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील पुणे शहरात अनेक दर्शनीय स्थळ आहेत. औरंगाबाद मधील अजंठा-वेरूळ च्या गुहा ऐतिहासिक कलाकृती म्हणून प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रात हिंदू जनसंख्या अधिक आहे येथील प्रमुख सण गणेश चतुर्थी हा आहे, परंतु याशिवाय दीपावली होळी, दसरा, ईद, नाताळ इत्यादी सणही मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महाराष्ट्र हे जवळपास सर्वच गोष्टींमध्ये एक संपन्न राज्य आहे. महाराष्ट्राला प्राचीन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.

Similar questions