My school essay in marathi in simple language
Answers
Explanation:
माझी शाळा निबंध
माझी शाळा म्हणजे सरस्वती विद्यालय खरच सरस्वतीचे मंदिर आहे. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. एक आई, दुसरे आपला परिसर आणि तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आपली शाळा. वाढताना आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या शाळेतच घालवतो. आपल्या शाळेवर आपले पालक एक मोठी जबाबदारी टाकतात. आणि सगळ्या शाळा ती जबाबदारी प्रामाणिकपणे पेलतात. म्हणून शाळा ही व्यक्ती आणि राष्ट्र घडवण्यात एक महत्त्वाचे कार्य करते. माझी शाळा, MY alma matter !
आई म्हणायची पूर्वी मुले शाळेत जाताना खूप रडायची. पण आता शाळा इतक्या आकर्षक झाल्या आहेत की मुलांना गाडीत बसून आरडा ओरडा करीत शाळेत जाताना मजाच वाटते. हो, आमच्या वेळे पासूनच शाळेची गाडी सुरु झाली. त्यात ड्राइव्हर काकांच्या शेजारी बसून जाण्याची मजा काही औरच. मी सगळ्यात पुढे! अगदी मोठा होईपर्यंत मी केबीन मध्येच बसून शाळेत जायचो. मी पहिल्यांदा शाळेत शिरलो तेंव्हा शाळेची एव्हडी मोठी इमारत बघून हबकूनच गेलो. आईचे बोट घट्ट धरून ठेवले. पण तेव्हड्यात आमच्या मुख्याध्यापिका बाई आली आणि मला जवळ घेऊन म्हणाल्या “काय दादा, गाडीत बसून मजा आली नं?” त्यांनी मला केबीन मध्ये बसलेले पहिले होते. मी लाजलो. पण त्या अजिबात रागवल्या नाही हे पाहिल्यावर त्यांची आणि माझी पहिल्याच दिवशी गट्टी जमली, ती आतापर्यंत. खरच! आमच्या शाळेत असे कडक वातावरण अजिबात नाही.
आमच्या टीचर ,आमच्या मैत्रिणी :
मोठ्या बाईंपासून आमच्या क्लास टीचर पर्यंत सगळ्या इतक्या चांगल्या आहेत की आम्ही घरापेक्षा शाळेतच जास्त रमतो. आम्हाला कधीही छडीचा मार बसत नाही. कधीही अंगठे धरून उभे राहणे, कोंबडा करणे अशा भयंकर शिक्षा आमच्या शाळेत नाहीत. आई तिच्या वेळच्या शिक्षा सांगते तेंव्हा अंगावर काटा उभा राहतो. पण याचा अर्थ आमच्या शाळेत शिस्त नाही असे मुळीच नाही. उलट आमची शाळा गावात शिस्तशीर मुलांची शाळा म्हणून ओळखली जाते. कारण आमच्या बाई म्हणतात “मुलांना असे करा म्हणून सांगावे लागत नाही. ती अनुकरण करीत असतात. त्यांना फक्त कसे वागायचे हे आपली वागणुकीतून दाखवावे लागते.” म्हणून आमच्या टीचर बरोबर वेळेला, व्यवस्थित गणवेश घालून आणि शिस्तीत रांगेत उभ्या आहे हे पाहिल्यावर आम्ही देखील तसेच करतो. सांगावे देखील लागत नाही.
आमच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेपासून होते. आम्ही सगळे वर्गा वर्गातून रांगेने मधल्या हॉल मध्ये जमतो. सरस्वती वंदने नंतर ओंकार आणि गायत्री मंत्र म्हंटला जातो. त्यानंतर महत्त्वाच्या बातम्या प्रतिनिधी सांगतात. मुख्याध्यापिका बाई त्या दिवसाचे सर्व धर्मातील महत्व सांगतात. आणि मग त्या दिवशी वाढदिवस असलेल्या मुलाचे किंवा मुलीचे एक रोप आणि फुल देऊन अभिनंदन केले जाते. नंतर आमच्या वर्गात जाऊन दिवस सुरु होतो. आमच्या शाळेन एक से बढकर एक हुशार शिक्षिका आणि शिक्षक आहेत. त्यांना त्यांच्या विषयाची उत्तम माहिती आहे आणि शिकवण्यात तर त्यांचा हात धरणारे कोणीच नाही. ते फक्त धडे वाचून शिकवित नाही तर त्या अनुषंगाने जग भरची माहिती आम्हाला देतात. त्यामुळे आम्ही फक्त पुस्तकी किडे न होता सर्व माहिती असलेले होतो. आम्हाला एका विषयाचा धडा शिकवताना त्याबरोबर इतर विषयातील पण माहिती देतात.
कोणीही टीचर नुसता भूगोल किंवा नुसते गणित असे एक्स्पर्ट नाही तर ते कुठलाही विषय तितक्याच कुशलतेने शिकवितात. त्यामुळे सर्वगुणसंपन्न म्हणजे काय हे आम्हाला कळते आणि आम्ही पण सर्व विषयात रस घेतो. नुसताच अभ्यास ही पण आमच्या शाळेची ओळख नाही. मैदानी खेळ पण आलेच पाहिजे ह्याबद्दल आमच्या शाळेचा आग्रह असतो.
शाळेत खेळाचे महत्त्व :
आमच्या शाळेला मोठे क्रीडांगण आहे. तेथे सर्व मैदानी खेळ शिकविले जातात. कबड्डी, खो खो, क्रिकेट, टेनिस, व्हौलीबोल असे सर्व खेळ खेळले जातात. तसेच आमच्या कडून धावण्याच्या शर्यतीचा पण सराव करून घेतात. व्यायाम शिक्षकांची तीक्ष्ण नजर मुलांमधील गुणाचं अवलोकन करीत असते. त्याप्रमाणे त्या त्या मुलाला विशिष्ट खेळाची सर्व माहिती देऊन प्रशिक्षक बोलावून त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अंतरशालेय तसेच इतर देशामध्ये पण आमच्या शाळेतील मुळे चमकली आहेत. आम्ही गर्वाने सगळ्यांना सांगतो की हा खेळाडू आमच्या शाळेचा आहे.
नुसता खेळच नाही, तर इतरही गुणांची शाळेत कदर केली जाते आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याला घडवले जाते. काही विद्यार्थी अभिनयात हुशार असतात, काही गाण्यात, तर काही वादनात हुशार असतात. काही भाषण करण्यात तर काही विनोद सांगण्यात हुशार असतात. आमची शाळा रत्नपारख्याची नजर ठेवून विद्यार्थ्यांना निवडते आणि घडवते. त्यामुळे आमची शाळा ही गुणी मुलांची खाण आहे. आमच्या शाळेतील किती तरी मुले आज राष्ट्राचे वैभव आहे ते अशा द्रोणाचार्य शिक्षकांमुळेच! त्यामुळे आमच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून सगळ्या गावाची धडपड असते. पण ह्याचा अर्थ असा नाही की आमची शाळा फक्त श्रीमंताची मुले शाळेत घेते. उलट आमचे शिक्षक गावा गावातून फिरतात आणि पाडे ,वस्त्या अगदी झोपडी मधील सुध्दा हुशार मुळे हेरून त्यांना फुकट शिक्षण देऊन त्यांचे व त्याबरोबर त्यांच्या घरच्याचं आयुष्य घडवितात. त्यापैकी कित्येक जण डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ आणि कलेक्टर झालेले आहेत.
मागच्याच वर्षी आमच्या शाळेतील १९८० साली दहावी झालेल्या मुलांचे संमेलन झाले होते. किती मोठे मोठे झालेले होते ते ! आणि किती भरभरून बोलत होते शाळेबद्दल. शिक्षकांच्या पाया पडत होते. अगदी अमेरिका ब्रिटन, आणि जर्मनी सारख्या देशातून येऊन त्यांनी हा समारंभ घडविला. आम्हालाही खूप चांगले मार्गदर्शन केले. खरच तेंव्हा आमच्या शाळेबद्दल अभिमानाने आमचा ऊर भरून आला.
असे वाटते शाळा सोडून जाऊच नाही. पण नाही! आम्हाला पण आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल करायचे आहे. नाही का !!
Marathi Nibandh on school