my village essay in marathi
Answers
आमच्या गावात ग्रामपंचायत आहे . ग्रामपंचायतीच्या जवळ एक शाळा आहे. गावात एक दवाखाना आहे . तेथील डॉक्टर गावकऱ्यांना तपासतात. माझ्या गावात प्राण्यांचा डॉक्टरही येतो . तो गावातील प्राण्यांचे आजार बरे करतो .
आमच्या गावात दरवर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम होतो. आम्ही गावात तऱ्हेतऱ्हेची झाडे लावली आहेत . त्यामुळे आमचे गाव हिरवेगार दिसते. आमच्या गावातील लोक मिळूनमिसळून वागतात . आमचे गाव जातीभेद पाळत नाही .
असे माझे गाव मला खूप आवडते . मी कुठेही गेलो, तरी मला माझ्या गावाची आठवण येते .
हल्लीच्या दुनियेत मला वाटत प्रत्येकाला गाव हा शब्द प्रचलित असेल याचे कारण असे कि बहुतांश लोक हल्ली नोकरीच्या निम्मिताने त्यांचे मूळ जन्मस्थान सोडून शहरात वसले आहेत. त्यामुळे कधी ना कधी प्रत्येक जण जन्मस्थानी जातच असेल. खरंच गाव म्हणलं कि डोळ्यांसमोर येते ती नवी दुनिया ! आपले जुने घर, चावडी,गावातील मोठे देऊळ, ग्रामपंचायत, मोठमोठी झाडे, हिरवेगार असे शेत, गुरे आणि गावातून जाणारा छोटासा रस्ता आणखी बरंच काही !आणि गावाला जायला म्हणावं तर संपूर्ण मन शहारून येते . तसे माझे गाव कोकणात वसले आहे त्यामुळे उन्हाळ्यात आंबे फणस काजू पावसाळ्यात मासे खेकडे आणि हिवाळ्यात शेकोटीची मजा तर काही औरच आहे. गणपती ,दिवाळी शिमगा इत्यादी सणांना तर पूर्ण गावच बहरलेलं असतं. तिकडची गोड माणसे ,निसर्ग ,आणि लाल माती तर मन मोहून टाकते. असं आहे माझं गाव. खरंच तुम्ही पण कधीतरी माझ्या गावाला या ते तुमची वाट नक्कीच पाहत असेल.