My younger sister essay in Marathi only 3 paragraphs
Answers
Answer:
माझी बहीण निबंध
“फुलोंका तारोंका सबका कहना है, एक हजारोंमें मेरी बहना है,सारी उमर हमें संग रहना है |” मी जेंव्हा जेंव्हा रुसते तेंव्हा माझी बहीण हे गाणं म्हणते आणि मी हसते.माझी बहीण, सोनाली माझ्या सर्व भाव भावना जाणते आणि आई सारखी माझी देखभाल करते. बहीण असावी तर अशी असे मी सर्वांना सांगते. आम्ही जरी दोघीच असलो तरी आमचे एक विश्व आहे आणि तिथे कुणालाच प्रवेश नाही. आई बाबाना पण नाही. दादा तर त्याच्याच दोस्तांमध्ये असतो. म्हणून समजायला लागले तेंव्हापासून एकाच व्यक्तीची छाप माझ्या आयुष्यावर पडली आहे .मी जे काही घडले आहे ते तिच्याकडे बघूनच. ती माझी मैत्रीण ,तत्वज्ञ आणि मार्गदर्शक आहे.
आमचे बालपण :
आम्ही तिघे भावंडं ! पण दादा खूप मोठा आहे. आम्हा दोघीत फक्त दोन वर्षांचे अंतर आहे.म्हणून मी तिला ताई कधीच म्हणत नाही. दादाचे मुलगा म्हणून लाड होतात मी लहान म्हणून माझे लाड होतात पण ती मधलीच म्हणून तिचे कधीच लाड होत नव्हते पण ती अत्यंत हुशार असल्याने ती सर्वांच्या कौतुकास पात्र झाली. ती एकपाठी म्हणजे एकदा वाचल्यावर लक्षात ठेवणारी आहे. म्हणून सतत तिचा पहिला नंबर यायचा आणि मला शिक्षक ओरडायचे, “ तुझी बहीण बघ कशी हुशार आहे. तू पण पहिला नंबर काढ .” मी पण त्यासाठी जोराने अभ्यास करायचे आणि पहिला नंबर पटकवायचे. पण कधी कधी मी कमी पडले की ती माझी बाजू घ्यायची. मी कुठल्या शाखेचे शिक्षण घ्यायचे हे पण तिनेच ठरवले होते. म्हणून तिने माझी चांगल्या कॉलेजामध्ये ऍडमिशन घ्यायला लावली. ती सर्व कलांमध्ये पारंगत आहे, उदा. नाच, अभिनय, स्पोर्ट्स, वक्तृत्व इत्यादी. म्हणून मला पण ह्या सर्व गोष्टीत विद्यालयाने भाग घ्यायला लावला. खरे पाहता माझी सर्टिफिकेट फाईल हे तिच्याच परिश्रमाचे फळ आहे
hope it helps