निबंध लिहा
आरश्याचे मनोगत
in marathi
write correct answer of 2 paragraphs then I will mark you brainlist.
Answers
Explanation:
काल परवाची गोष्ट आहे. मी आरशासमोर उभा राहून माझा मलाच निरखून पाहत होतो. तेवढ्यात मला कुठून तरी आवाज आला... म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागलो. परंतु रूमात माझ्या शिवाय कोणीही नव्हते. इतक्यात पुन्हा आवाज आला अरे ऐ दादा ऐ एकडे पहा, मी आरसा बोलतोय! समोर पाहतो तर काय चक्क आरसा माझ्याशी बोलत होता. मी थोडा घाबरलो हे कसे शक्य आहे. परंतु आरसा मला समजावीत सांगू लागला. घाबरू नको, खूप दिवसांपासून मला तुझ्याशी बोलायचं होतं. आणि आज मला संधी मिळाली.
अरे, जेव्हा मानव उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर होता, तेव्हा मानवाजवळ अन्न, वस्त्र व निवारा तर होताच. परंतु मनुष्याने स्वतःचे प्रतिबिंब पहिल्यांदा पाण्यात पाहिले. तेव्हा त्याला आपले रूप लक्षात आले. यानंतर पाण्यातून काचेचा व काचेतून माझा जन्म झाला. आधीच्या काळात प्रतिमा पाहण्यासाठीचे एकमेव साधन पाणीच होते. कालांतराने माझे रूप बदलत गेले. आज माझी अनेक रूपे आहेत, अनेक प्रकारात मी उपलब्ध आहे अंतर्गोल, बहिर्गोल, सपाट, गोल मोटरीचा आरसा, घरातला लहान आरसा, महलातील मोठे आरसे ही सर्व माझीच भावंडे आहेत, फक्त आमचे आकार व रूप वेगवेगळे आहे.
तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत तुम्ही अनेक जीवनावश्यक गोष्टींचा वापर करीत असाल. त्याच आवश्यक गोष्टींपैकी एक आहे मी म्हणजेच आरसा. कारण आज-काल घरातून बाहेर पडणारा प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरूष प्रत्येक जण एकदा तरी आरशात आपला चेहरा हा पाहतो. मी माझ्या मध्ये लोकांना त्यांचे स्वरूप दाखवतो. माझ्यामध्ये आपली प्रतिमा पाहून लोक आनंदित होतात. मी नेहमी लोकांना त्यांच्या वास्तविक स्वरूपाची ओळख करून देतो. मी नेहमी सत्यच दाखवतो. स्त्रिया तर त्यांच्या सौंदर्याकडे पाहत तासन्तास माझ्यासमोर उभ्या असतात