Social Sciences, asked by radhika1222, 9 months ago

निबंध लिहा एका वृद्धाचे मनोगत​

Answers

Answered by Anonymous
45

⠀⠀⠀⠀⠀एका वृद्धाचे मनोगत

मुलांनो, मी एक वृद्ध आजोबा बोलत आहे. आता माझे खूप वय झाले आहे. माझे हातपाय थकले आहेत. मी पूर्वीप्रमाणे सर्व कामे करू शकत नाही. त्यामुळे मला कधी कधी खूप त्रास होतो.

मी तरुण होतो, तेव्हा खूप कष्ट केले. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. त्यांच्यासाठी मी खूप कष्ट केले. त्यांना खूप शिकवले. त्यांनी खूप मोठे व्हावे, असे माझे स्वप्न होते. माझी दोन्ही मुले आता परदेशात आहेत. ती परदेशात गेली, तेव्हा मला किती अभिमान वाटला होता! सुरुवातीला खूप छान वाटले. पण मग त्रास होऊ लागला. अनेकदा मला मुलांची आठवण येते. त्यांना भेटावे, असे वाटते. नातवांना पाहावे, असे वाटते. पण ते शक्य होत नाही. काही वर्षांपूर्वी माझी पत्नी वारली. आता मी एकटाच राहतो. कुठे जावेसे वाटले, तर जाता येत नाही. काही वेगळे खावेसे वाटले, तर मिळत नाही. आजारी पडलो, तर देखभाल करायला कोणीही नसते.

माझ्यासारखे असे अनेक वृद्ध आहेत. सगळे एकाकी आहेत, असहाय आहेत. त्यांना मदत करा. त्यांचे दु:ख हलके करा

Answered by Anonymous
48

Answer:

एका वृद्धाचे मनोगतमी

मा.बो. करांच्या इच्छेनुसार मांडणीत बदल केला आहे.

Explanation:

वयाबरोबर पाठीने घेतला बाक आहे

प्रकृतीत आजारांना लाडाचा थाट आहे

पोटभरतीस औषधांचा आहार मुख्य आहे

चिंतलेल्या मनास धार्मिकतेचा आधार आहे.

जेष्ठ नागरीकत्वाची समाजात ठिगळ आहे

देणगी रुपातली चबुतर्‍यावर नावाची ओळ आहे

पुतळ्यालाही सढळ हस्ते दिल्यास वाव आहे.

सौभाग्यवती मृत होऊन भाग्यवान आहे

भोगयातना साहण्यास उरले जीवनमान आहे

मनोरंजनी नातवंडं शिल्लक समाधान आहे.

मुला-मुलींचा आपआपला संसार स्वतंत्र आहे.

इस्टेटीच्या वाट्यात मन मात्र एकत्र आहे.

मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे

तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान स्थित आहे.

माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे

कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे

कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे

ही माझी जुनी मांडणी आहे.

नविन मांडणीसाठी मला काही मा.बो.करांचे सल्ले मिळाले त्याबद्दल धन्यवाद.

वयाबरोबर पाठीनेही बाक घेतला आहे

प्रकृतीने आजारांनाही लाडावले आहे

आहारा पेक्षा औषधच पोट भरत आहे

धार्मिक क्षेत्रात मन आता विसावत आहे

जेष्ठ नागरीक म्हणून समाजात ठिगळ आहे

देणगी देऊन चबुतर्‍यावर नाव कोरल आहे

सढळ हस्ते दिल्यास पुतळ्यालाही वाव आहे

सौभाग्यवती मृत होऊन भाग्यवान ठरली आहे

दु:खाचे भोग मी घडलेल्या पापांबरोबर भोगत आहे

नातवंड खेळवण्यात मनोरंजन उरले आहे

मुला-मुलींनी आपाअपले स्वतंत्र संसार थाटले आहेत

इस्टेटीच्या वाट्यात मात्र सगळ्यांचे मन एकत्र आहे

मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे

तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान उरला आहे

माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे

कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे

कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे

Similar questions