India Languages, asked by RedCream28, 5 hours ago

निबंध लिहा:-
मोबाईल नसते तर...


Answer correctly!!​

Answers

Answered by bhaskarparidhi
8

Answer:

आजचे आधुनिक युग मोबाईल व संगणकाचे युग आहे. आजचे जग मोबाईल शिवाय अपूर्ण आहे. मनुष्याने लावलेल्या शोधांमध्ये मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन आहे. आजकाल दिवसाची सुरुवात मोबाईलनेच होते. व्यवसाय नातेवाईक व मित्र मंडळी शी संपर्क करण्यासाठी मोबाईल चा वापर केला जातो. तरुणांमध्ये तर मोबाईल चे चलन दिवसेंदिवस वाढत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर मोबाईल नसता तर...?

आज जर मोबाईल नसता तर आजचे हे युग आधुनिक युग म्हटले गेले नसते. कारण आजच्या आधुनिक युगाला परिवर्तित करण्यासाठी मोबाईल ची भूमिका महत्त्वाची आहे. विकासाच्या मार्गावर आज सर्वच वस्तू डिजिटल झाल्या आहेत. मोबाईल नसता तर डिजिटल क्रांती आणणे शक्य झाले नसते. कारण मोबाईलच्या च मदतीने पैश्यांची देवाण घेवाण होते. मोबाईल नसता तर नातेवाईक, मित्र तसेच व्यावसायिक लोकांना संपर्क करणे शक्य झाले नसते.

आजकाल प्रत्येक वस्तू स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे. जगभराची माहिती घरबसल्या मोबाईल मुळे मिळवणे शक्य होते. परंतु जर मोबाईल नसता तर जगात काय काय नवीन घडत आहे हे लक्षात आले नसते. ऑनलाईन शॉपिंग आज मोठ्या प्रमाणत वाढत आहे मोबाईल नसल्यावर ऑनलाईन शॉपिंग देखील करता आली नसती. आजकाल ज्या लोकांना रस्ता माहीत नसतो ते गुगल मॅप मदतीने एका जागेहून दुसर्‍या जागी पोहोचतात. परंतु जर मोबाईल नसता तर लोकांना परत परत इतरांना विचारात मार्ग शोधावा लागला असता.

ज्याप्रमाणे मोबाईल नसण्याचे दुष्परिणाम आहेत त्याच पद्धतीने याचे काही फायदेही आपल्याला मिळाले असते. आज लोकांना अति मोबाईल वापराचे व्यसन जडत आहे. मोबाईल मध्ये दीर्घकाळ गेम खेळणे इंटरनेटचा वापर करणे यामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोकेदुखी, डोळे चुरचुरणे या सारख्या समस्या निर्माण होत आहेत. मोबाईल नसता तर या समस्या निर्माण झाल्या नसत्या. लोकांनी आपआपल्या मोबाईल मध्ये न पाहता एकमेकांशी गप्पा गोष्टींमध्ये वेळ घालवला असता.

मोबाईल च्या मदतीने वाईट बुद्धीचे लोक हॅकिंग करून लोकांची माहिती चोरतात व त्याचा चुकीचा वापर करतात. जर मोबाईल नसते तर ऑनलाईन हॅकिंग झाली नसती. आजकाल मोबाईल मुळे ब्लॅकमेलिंग चे प्रमाणही वाढले आहे. मोबाईल नसता तर या सर्व समस्याही नसत्या. शास्त्रज्ञांचे मानणे आहे की मोबाईल फोन मधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराला हानीकारक असतात व दरवर्षी हजारो पक्ष्यांचा मृत्यू या रेडिएशन मुळे होते. जर मोबाईल नसता तर या समस्याही उभ्या राहिल्या नसत्या.

शेवटी येवढेच सांगता येईल की मोबाईल वापराचे फायदे तर आहेत परंतु याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून मोबाईल चा कामापुरता व योग्य पद्धतीने वापर करायला हवा.

Explanation:

ᴍᴀʀᴋ ᴍᴇ ᴀs ʙʀᴀɪɴʟɪsᴛ✌️✌️

Answered by xXMissSuchana999Xx
34

Answer:

आज मोबाईल आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. एकवेळ जेवायला मिळाले नाही तरी चालेल पण मोबाईल रिचार्ज साठी पैसा हवा अशी परिस्थिती बनली आहे. अगदी हातगाडीवाल्यापासून ते भाजी विक्री करणाऱ्या बाईकडेही आजकाल मोबाईल बघायला मिळतो. मोबाईल ने सामान्यांच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवून आणली आहे. दूरवर अमेरिकेत जाऊन वसलेल्या मुलांच्या म्हाताऱ्या आईबापासाठी मोबाईल हे एक वरदानच आहे. विडिओ कॉल मुळे त्यांना आपल्या मुलांशी नातवंडांशी सहज संवाद साधता येतो. इथेच न थांबता दररोजचे व्यवहारही आजकाल मोबाईल वर घरबसल्या होऊ लागले आहेत.

आधुनिक क्रांतीमुळे मोबाइल संगणकाचेही काम करू लागला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी ई-मेल तपासण्यासारखे काम सोयीचे झाले. मोबाइलमधील घड्याळ, कॅलक्युलेटर, एफ. एम., कॅमेरा यासारख्या सुविधांमुळे इतर उपकरणांचे पैसे वाचले. र्वल्ड कॉलिंग कार्डसारख्या सुविधांनी परदेशस्थ नातेवाईक व उद्योजक यांच्याशी स्वस्तात संपर्क शक्य झाला.

Similar questions