निबंध लिहा - माझी आई , माझे बाबा
कुठला पण एक
Answers
Explanation:
The gamer had daughters
Answer:
निबंध: माझी आई
Explanation:
माझी आई मला खूप खूप आवडते. माझे माझ्या आई वर खूप प्रेम आहे. मातेच्या प्रेमाला कशाची तुलना नाही . माझी आई माझे मन कधीच दु:खवत नाही. घरात आई नसली की , माझे मन घरात लागत नाही. माझी आई मला समजून घेते.ज्यांची आई नसते त्याची व्यथा जसे की, "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ".
माझी आई एक गृहीणी आहे. घरात सर्व प्रथम आईच उठते. ती मला दररोज लवकर उठवते. मला उठवतांना ती प्रेमाने हात फिरवते. तिचा स्पर्श ,तिची येन्याची चाहूल नकळत समजते. मला चांगल्या सवयी लावते.मला शिकवते. चूकल्यावर शिक्षा करते . मी माझ्या आईमूळे यशाच्या पायरीवर पुढे चढते. त्यात यशात माझ्या आईला श्रय देते. माझी आई माझ्या साठी खूप मेहनत करते. स्वंंयंंपाक करण्यात ती कुुशल आहे. माझे आजोबा व आजी आपल्या सूनबाईला 'अन्नपूर्णा' असे संबोधून सतत कौतुक करत असतात.
आईचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. त्यामुळे माझी आई माझा आदर्श आहे.
माझी आई माझ्या साठी मायेचा सागर आहे. माझी आई माझ्या साठी देव आहे.माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे.माझ्या आईची माझ्यावर असणारी मायेची तुलना करता येणार नाही. कधीपण कोणतीही वस्तूची गरज भासली की ,पहिला ओठांवर येणारा शब्द म्हणजे आई.सकाळी उठली की, दिवसाची सुरुवात आई च्या दर्शनाने होते,आई शब्दा ने होते. म्हणून मला माझी आई खूप खूप आवडते
आई हा शब्द भावना आणि प्रेमा ने भरला आहे.आई या अमूल्य शब्दाचे मूल्य मुलांना समजते. ज्यांना आई नाही त्यांच्या मनावर कोणता प्रसंग अाला असेल , कशी वेळ आली असेल याची कल्पना सर्वांना असेल . म्हणून ज्याचा जवळ आई आहे तो श्रीमंत आणि त्यांना अभिमान वाटला पाहिजे .
पण या जगात अशी मुलही आहे जी आपल्या आई - वडील यांना ओझे समजतात. कधी कधी काही स्वार्थी मुलं आईला वृद्धाश्रमात सोडतात. ही लाजिरवाणी बाब आहे. आपली आई मुलांना घडवताना संघर्ष करते . मेहनत करत, दिवस रात्र एक करते ,मुल आजारी पडल्यावर रात्र - रात्र जागरण करते आणि त्यांना लहानाचे मोठे करते ,मुलांना घडवते. अणि आजचा काही मुलांना आईला सांभाळण्याची वेळ आली तर तिला ओझा समजले जाते. वृद्धा आश्रमात सोडले जाते .असे काही कानावर पडल्यावर , डोळ्यांनी पाहिलें तर डोळ्यात अश्रु येतात. अणि शरमेने खाली मान जाते.
आई ममते चा सागर आहे. आईची तुलना जगात दुसरे कोणाशीही करता येणार नाही. आई इतके प्रेम , ममता ,संस्कार ,प्रेरणा दुसरों कोणीही देऊ शकता नाही. आज आपण सर्व हे सुंदर जग आई मुळे बघतो आहे.त्यांनी दिवस रात्र एक करुन आपल्याला घडविले.त्या आई - वडील यांची सेवा करायला मला आवडेल.
तर मित्रांनो हा होता माझी आई मराठी निबंध , Mazi Aai essay in Marathi , Majhi Aai Marathi Nibandh मधे एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. कारण तुम्ही दिलेला प्रत्येक प्रतिसाद आम्हाला उत्साह देऊन जातो. धन्यवाद.
please mark me BRAINLIEST