French, asked by sp3774163gmailcom, 11 months ago

(६) निबंध लिहा- 'मी सैनिक झाले/झालो तर.. nibandh in marathi

Answers

Answered by XxOollMrVENOMIloOxX
1

Explanation:

माझ्या जीवनाचे एक लक्ष्य सैनिक बनणे ही आहे. जर मी सैनिक झालो तर खूप चांगले होईल. अधिकांश विद्यार्थी मोठे झाल्यावर डॉक्टर, इंजिनीअर, कलेक्टर, शिक्षक इत्यादी बनण्याचे स्वप्न पाहत असतात. परंतु माझी स्वप्न सैनिक बनणे आहे. लहानपणापासूनच मला देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. जेव्हा मी प्राथमिक शाळेत शिकत होतो, तेव्हापासूनच माझे वडील मला सांगत असत की तुला देशासाठी काहीतरी करून दाखवायचे आहे.

आज आपल्या देशात खूप सार्‍या समस्या निर्माण झाल्या आहेत. शत्रु देशांमुळे दररोज काही ना काही समस्या उभी राहत आहे व यासाठी आपल्या देशाचे सैनिक नेहमी प्रयत्न करीत असतात. जर मी सुद्धा एक सैनिक राहिलो असतो तर देशाच्या सुरक्षेसाठी मी प्राणांची पर्वा न करता लढलो असतो. देशाचे होत असलेले नुकसान रोखण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न केले असते. देशाच्या सैनिकावर संपूर्ण देशाची जबाबदारी असते. एक सैनिकच देशाच्या भल्यासाठी कार्य करतो.

जर मी सैनिक राहिलो असतो तर मला कुटुंबापासून दीर्घकाळासाठी लांब राहावे लागले असते. परंतु या गोष्टीचे मला अजिबात दुःख राहिले नसते. कारण मी माझ्या देशाच्या सुरक्षेसाठी घरापासून दूर गेलो असतो यामुळेच माझे कुटुंब ही दुःख व्यक्त न करता अभिमानाने राहिले असते. त्यांना सर्वांना आनंद झाला असता कि मी देशासाठी काहीतरी करीत आहे. जरी मी माझ्या समाजापासून दूर राहिलो असतो तरी वेगवेगळ्या ठिकाणच्या फौजी मित्रांशी माझी मैत्री झाली असती.

जर मी एक सैनिक राहिलो असतो तर सर्वच लोकांनी माझा सन्मान केला असता. जेव्हा जेव्हा मी माझी ड्युटी संपवून घरी आलो असतो तेव्हा गावातील सर्व लोकांनी माझे उत्साहाने स्वागत केले असते. अशा पद्धतीने एक सैनिक बनवून मी माझे व माझ्या कुटुंबाचे नाव उज्वलीत केले असते. आपल्या देशात असे भरपूर सैनिक आहेत जे देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वाही करीत नाही. मी पण त्याच सैनिकांप्रमाणे देशाच्या रक्षणासाठी जीवनाची पैज लावली असती

Similar questions