निबंध लिहा (मराठीत) ।।।।।।।।।।।।
Answers
Explanation:
माणसाला जगायला शिकवते ती म्हणजे कला आणि कला ‘माणूसपणाकडे’ नेण्याची पायवाट आहे. त्यांच्या जगण्याला एक उंच खोली देते. दररोजच्या कंटाळवाण्या -हाट गाडयातून एक हवाहवासा वाटणारा विरंगुळा म्हणजे कला, विरूप जगण्याला सौंदर्य प्रदान करते ते म्हणजे जगणे आणि हेच जगणे अधिकाधिक सुसह्य होत जाते आणि विशेष म्हणजे अपरिहार्य दु:खाचा विसर पाडतात, त्याविषयी एका कवीने म्हटले आहे की-
या दु:खाच्या बाता, गाण्यात गाता
जातील विरूनी गाडया!
या दु:खाचं काय, जागोजागी याचेच पाय
जखमांवरती थोडीशी फुंकर, मायेची साथ!
अशा भरभरत्या जखमेवर फुंकर घालण्याचे काम या साऱ्या कला करतात. कला हा विरंगुळा नसून माणसाला, समाजाला, सुसंस्कृत, संवेदनशील व विचारप्रवण बनवते. तसेच विरंगुळा हा कला निर्मितीचा एक ‘बाय प्रोडक्ट’ आहे. तरीही अभिव्यक्त होण्याच्या अनिवार्यतेतून कला निर्मिती होते.
तशीच एक कला माझ्याही अंगी अवगत आहे. ती म्हणजे चित्रकला. चित्र व माझे नाते जन्मोजन्मीचे आहे, असे मला वाटते; परंतु त्या चित्रकलेचे महत्त्व त्या वेळी माहीत नसल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. तसेच आई-वडिलांचेही माझ्या कलेकडे लक्ष नसल्याकारणाने तेही प्रोत्साहन करण्यास उत्सुक नव्हते. मी सुट्टीच्या दिवशी नेहमीच चित्र काढायची.
कमी वेळेत जास्त चित्रे काढून व रंगवून होईल. हे चित्र काढणे किंवा रंग- रंगोटी करणे हे मी बेडरूममध्ये लपून करत असे, याचं कारण असं की, हे चित्र आईने पाहिले तर प्रवचन देण्यास सुरुवात करेल ‘की इतके तास तू हे काम करत होती का? हे काय आहे? किती पसारा हा! सर्व ठिकाणी रंग सांडून ठेवतेस. त्या वेळातच अभ्यास केला असता तर विषयात टक्केवारी वाढली असती आणि हा पसारा तरी पडला नसता’, ती म्हणत असे. या कारणाने माझे कलेकडे दुर्लक्ष झाले होते. तशी अनेक चित्रं मी काढायची; परंतु मनापासून ते साकार होत नव्हते. कारण मला प्रोत्साहन देणारे त्यावेळी कोणीही नव्हते.
शाळेत असल्यापासून मी विविध स्पर्धाना जायचे. स्पध्रेत विविध शाळेची भरपूर मुलं सहभागी होत असत. विद्यार्थाचा परिचय होत असे. प्रत्येक स्पर्धा ही माझ्यासाठी आठवण म्हणून मनात कायम राहावी. या विविध स्पध्रेतून मला खूप अनुभव आले. खूप काही शिकण्यास मिळाले. आपण कुठे मागे पडत आहोत, याचे योग्य ज्ञान होत असे. काही स्पर्धामध्ये क्रमांक आल्यावर खूप आनंद होत असे.
वरिष्ठांकडून सत्कार व बक्षीस मिळत असे.’ मी वर्तमानपत्रामध्ये एक लेख वाचला. त्यामध्ये असे वाक्य लिहिले होते की, स्पध्रेत क्रमांक आल्यावर हुरळू नये तर अपयश आले म्हणून खचून जाऊ नये. मनात कलेबद्दल क्रोध निर्माण करू नये. कला ही ईश्वर देणगी आहे, या कलेचा आपले जीवन फुलवण्यासाठी उपयोग केला पाहिजे. कला ही नेहमी आपल्याबरोबर असते. सुख-दु:खात ती आपली सोबतीण होते.
माझ्या कलेचा प्रवास लहान वयातच सुरू झाला. अभ्यास सांभाळून मी चित्रं काढत असे. प्रत्येक वेळेला नवीन कलाकृती निर्माण करणं हाच प्रयत्न सतत चालू असे. या प्रयत्नातून मला विविध अनुभव येण्याची सुरुवात झाली. माझी कला माझ्यासाठी सर्वस्व बनली. कला हे माझे अस्तित्व, माझी ओळख हे मला समजून चुकले. कला शिक्षकांचे मार्गदर्शक घेऊन मी विविध चित्र काढण्याची सुरुवात केली. प्रत्येक चित्र हे पहिल्या चित्रांपेक्षा सुंदर कसे होईल, याकडे माझे लक्ष असायचे. चित्र संपूर्ण काढून झाल्यावर त्याचे बारीक निरीक्षण करणे व आपली चूक स्वत:च सुधारणे यावर मी अधिक भर दिला. डोळ्यांची नजर, मन, हातातली लय, तिन्ही बाबी एकमेकांमध्ये भिडतात तेव्हा कोणतीही कलाकृती सुंदरच होते, असे माझे ठाम मत आहे.
ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते म्हणतात, ‘चित्राचं काम काय, तर शब्दांपासून दूर नेणं’ शब्दांपासून ते दूर नेतं त्याला चित्र असं म्हणतात. अशा चित्रकारांच्या पंगतीतील एम.एफ.हुसेन, रवी वर्मा, दीनानाथ दलाल यांच्यासारख्या चित्रकारांचे चित्र पाहिल्यावर मनात उत्साहाचे कारंजे उसळतात; परंतु मला एका गोष्टीची खंत वाटते ती म्हणजे, चित्रकलेच्या संदर्भात बाजारीकरण झाले.
यांचे मुख्य कारण म्हणजे अनुकरणवादी आणि निष्कर्ष शून्य भारतीय आधुनिक कला जबाबदार आहे. त्यांच्यात नामवंत कलाकारांचीही मोठी चूक होती की, कलेवर विसंबून राहता कलेला साधनेच्या दृष्टिकोनातून पाहायचे असा साधनेचा दुष्टिकोनामुळे नवीन कलाकार निर्माण होण्याची प्रक्रिया थांबली आणि प्रत्येक जण नोकरी धंद्यात रमून बसले. मग कलेकडे दुर्लक्ष होऊ लागले, म्हणूनच कलेला बाजारीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले. हे थांबायचे असेल तर सर्व क्षेत्रात नवनवीन कलाकार जोमाने घडताना दिसतात. त्यांना परिपक्व होण्यासाठी वेळ द्यायला हवा आणि रसिकांनी त्यावर कोणताही शिक्कामोर्तब करण्यास घाई करू नये. मगच कर्तव्य बाजारीकरण थांबवता येईल.
आजच्या स्वातंत्र्याबरोबर आम्हाला जो एक्सपोजर आणि जो कॅनव्हास उपलब्ध करून दिला तो निव्वळ अफलातून व अभिव्यक्तीच्या मुक्त आविष्कारामुळेच. तंत्रज्ञानातील क्रांतीची माध्यमे खुली झाली. नवे प्रयोग करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. फक्त आता नवे प्रयोग करण्याचे आणि नवे मार्ग चोखण्याची गरच आहे. तेव्हा केशवसूतांच्या काव्यओळी अधिकच समर्पक वाटतात, ते म्हणतात..
आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे,
आम्हाला वगळा विकेल कवडी मोलांपरि हे जिणं!
अशी मानवी जीवनाची अवस्था होईल.