निबंध लिहा - शब्दांचा महत्त्व
Answers
Answer:
अक्षरांच्या एकत्र येण्याला आपण शब्द म्हणतो का ? नाही अक्षर एकत्र आल्यानंतर त्यातून काही ना काही अर्थ ज्यावेळी अभिप्रेत होतो तेव्हा तो शब्द म्हणुन ओळखला जातो. शब्द हा शब्द जरी बोलण्यास आणि लिहीण्यास सोपा असला तरी त्याची ताकद फार मोठी आहे. शब्दांच वजन हे मानल तर अनु इतक सुक्ष्म आणि नाही पेलल तर पर्वताइतक मोठ असत. शब्दांचे वजन हे व्यक्ती परत्वे बदलत असत. शब्द हे शस्त्रापेक्षाही धारधार असतात. पण त्याची धार ही बोलणा-याच्या चारित्र आणि वागण्यावर अवलंबुन असते. शांत कमी आणि नेमके बोलणा-या व तसे वागणा-या माणसाचे शब्द नेहमीच वाचाळ माणसापेक्षा धारधार असतात.
आज शब्दांची ताकद कमी झालेली दिसते. त्याचही कारण आपणच आहे. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात एकसंगता राहिली नाही. आज वचन हा शब्द नावापुरताच अस्तित्वात राहिला आहे. पुर्वीच्या काळी ऋषी मुनिंचा आशिर्वाद आणि शाप हे दोन्ही परिणाम कारक असायचे. आज शब्दांची लया गेली. त्यातील ताकद संपली. कारण दिल्या शब्दाला जागण आपण विसरलो. शब्दांच महत्व संपत आल. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतक्या मोठया बादशाही आणि आदिलशाही सत्तेला टक्कर दिली आणि स्वराज्य उभे केले. त्या पाठीमागे शौर्य हे एकच कारण होत का ? नाही. त्यांच्या तोंडातून पडणा-या एका शब्दासाठी जीव देणारी माणसं त्यांच्याजवळ होती. त्या शब्दांची ताकद तितकी मोठी होती. त्या शब्दांना ती ताकद प्राप्त करुन देणारे ते राजेही तितके चरीत्रवान होते.
आपल्या तोंडातून निघणा-या शब्दांना ताकद प्राप्त करुन देण्याच सामर्थ्य फक्त आपल्यातच असतं. ते कुणी दुसर निर्माण करु शकत नाही. आपले कर्तुत्व आणि चारीत्र आपल्या शब्दांमधे ताकद निर्माण करते. शस्त्रापेक्षाही सगळयात मोठा घाव हा शब्दांचा असतो. शस्त्रांचे घाव भरले जातात पण शब्दांचे घाव भरले जात नाहीत. काळाच्या ओघात ते पुन्हा कधीना कधी आठवण करुन देतातच. पण हे ही तितकच खरं आहे की, शब्दांच्या घावावर शब्दांचाच मलम उपयोगी पडतो. दुसर औषध नाही चालत त्याला.
कितीही नाही म्हंटल तरी शब्दांच सामर्थ्य आपण डावलू शकत नाही. शब्द हे अर्जुनाच्या न संपणा-या बाणांच्या भात्यासारखे असले तरी त्यांचा कसाही वापर करणे योग्य नाही. आपल्या शब्दांची मर्यादा आपणच ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे पावित्र आणि ताकद आपोआपच राखली जाईल. शब्दांची ताकदच माणसाला त्याच्या वैयक्तीक जीवनात खुप उंचीवर घेवुन जाते. म्हणुन शब्दांचा वापर खुप काळजीपुर्वक असावा.
Explanation:
please Mark me as brainliest