१)निबंध लिहा दोनशे ते अडीचशे शब्द_
माझी मातृभाषा
Answers
Explanation:
संत ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेचे कौतुक करताना म्हणतात कि,
माझ्या मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातेही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिका मेळविन ||
अमृताहुनी गोड असलेली मराठी हि आपल्या महान अशा महाराष्ट्राची मातृभाषा आहे. आपल्याला आईसारखी जवळची आणि प्रिय असलेल्या मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. आज असंख्य साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे. सुरुवातीला आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ, यानंतर अनेक विचारवंत आणि लेखकांनी लिहिलेली पुस्तके, कथा कादंबऱ्या यामुळे मराठी भाषेच्या साहित्यात अमुलाग्र बदल होत गेला. मराठी भाषेतील आद्यकवी शंकराचार्य यांनी आपल्या विवेकसिंधू ग्रंथामध्ये मराठी भाषेचा गौरव करताना सांगितले आहे कि आपल्या मराठी भाषेत इतके ग्रंथ उपलब्ध आहेत. खूप सारे ज्ञान आपल्या भाषेत उपलब्ध आहे. मग आपण ज्ञान मिळवण्यासाठी इतर भाषांचा उपयोग का करावा.
माझी मराठी मला प्रिय आहे. परंतु महाराष्ट्रात मराठी भाषेला मनाचे स्थान मिळताना आजतरी दिसत नाही. हि आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ठिकठिकाणी मराठी भाषेची गळचेपी होताना दिसते. मराठी शाळा बंद होऊन या शाळांची जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतली. मराठी शाळांमध्ये मराठी हि ज्ञानभाषा असते म्हणजे सर्व विषयांचे ज्ञान आपण मराठी भाषेतून ग्रहण करत असतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी हि ज्ञानभाषा असते. सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेतून घ्यावे लागते. मोठमोठ्या शिक्षणतज्ञांनी सांगितले आहे कि ज्ञान मिळवण्यासाठी आपली मातृभाषा उत्तम. परंतु हे आपल्या जनतेला आणि पालकांना कधी समजणार? आजच्या शिक्षणमहर्षीनी शिक्षणाचा बाजार उठवलाय. या बाजारात मराठी भाषेला नगण्य स्थान आहे. इंग्रजी पुढे चालले.
आपले उच्चभ्रू पालक लयच भारी. आपल्या पोरांना टाकायचं इंग्लिश शाळेत आणि ओरडायच मराठी भाषा मागे पडते आहे. अशा दुपट्टी पालकांनी मराठी भाषेच्या अभिमानाच्या वार्ता तर करूच नये. काय तर म्हणे मराठी शाळेत शिकवत नाहीत. दर्जा कमी होत चाललाय मराठी शाळेचा. इंग्रजी शाळेतील शिक्षणाचा दर्जा किती चांगला असतो हे पण सगळ्यांना माहित आहे. ज्या दिवशी एखादा विध्यार्थी मराठी शाळेची पायरी सोडून इंग्रजी शाळेची पायरी चढतो त्या दिवशीच मराठी भाषा आपल्या महाराष्ट्राच्या शिखरावरून एक एक पायरी खाली येत राहते. आणखी किती खाली आणणार आपल्या मायबोलीला.
मराठी भाषेची अधोगती थांबवायची असेल तर आधी मराठी शाळांची अधोगती थांबवायला हवी. तरच आपल्याला अधिकार आहे
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’
हे म्हणण्याचा.
नाहीतर अस होईल,
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |
आणि आई मुलांना इंग्रजी शाळेत पाठवती ||