Hindi, asked by lavanya397664, 7 months ago

निबंध लेखन
आमच्या शाळेची सहल.
please answer it fast​

Answers

Answered by Jsh79579
6

Answer:

दरवषीर्प्रमाणे यंदाही आमच्या शाळेची सहल गेली होती. सहल जाण्याच्याविषयी एक आठवडा अगोदर गुरुजींनी आम्हा सर्व मुलांना सहलीविषयी सांगितले. सहलीचे ठिकाण होते किल्ले रायगड. आपल्या शाळेची सहल जाणार हे ऐकून आम्हा सर्व मुलांना खूप आनंद झला. माझा आनंद तर गगनात मावेनासा झाला. सहलीचा विषय काढल्याच्या दुसऱ्या दिवसापासून वर्गात सहीविषयीची चर्चा सुरू झाली. कोणताही मुलगा किंवा मुली शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नव्हता. प्रत्येकाची आपापसात सहलीविषयीची चुळबूळ चालू होती. ‘आपण तेथे गेल्यावर खूप मज्जा करायची”, ‘पकडापकडी खेळायचे’, ‘बॅट- बॉल खेळायचे” हीच वाक्ये प्रत्येक मुलाच्या तोंडून येत होती. मी ही ठरवली होतं की तिथे गेल्यावर जीवाचं रान करायचं.

बघता बघता दिवसामागून दिवस गेले. सहल जाण्याची तारीख होती. ११ फेब्रुवारी. अखेर सहलीचा दिवस उजाडला. शिक्षकांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे सर्व मुलं शाळेचा गणवेश घालून ठीक सकाळी ५.४५ वाजता शाळेत जमली. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शाळेच्या आवारात तीन मोठ्या लक्झरी बसेस उभ्या राहिल्या. शाळेच्या आवारात प्रथमच पालकांची गदीर् झाली होती. प्रत्येक पालक आपल्या बिन ओळखीच्या पालकांशी सहलीविषयी विचारपूस करत होता.

सर्व शिक्षकांनी आम्हाला शिस्तीचं पालन करण्यास सांगितलं. तसेच आपल्या शाळेचं नाव खराब होईल, अशी कोणतीही गैरवर्तणूक न करण्यास बजावलं. हजेरी घेण्यात आली. सहल असल्यामुळे कोणताही मुलगा किंवा मुलगी गैरहजर नव्हती. ठीक ६.३० वाजता बस रायगडकडे जाण्यास निघाली. गाडी सुरू होताच सर्व मुलांनी ‘गणपती बाप्पा मोरया” असा आवाज दिला आणि अखेर आम्ही रायगडकडे जाण्यास निघालो. बसमध्ये प्राण्यांच्या भेंड्या, नाचणे, एकमेकांना चिडवणे या सर्व गोष्टी चालू होत्या.

पाच-सहा तासांच्या प्रवासानंतर अखेर आम्ही रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. समोर साक्षात रायगड किल्ला उभा होता. किल्ला पाहून मी थोडा घाबरलोच. पण मनात पक्का विचार केला होता की न डगमगता हा किल्ला चढायचा. रायगडावर चढताना आम्ही सर्व मुलांनी हर हर महादेव”, ”शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा केल्या. रायगडावर चढणारी मुले ही जणू शिवाजी महाराजांचे मावळेच वाटत होते. दोन तासांनी आम्ही रायगडाच्या महाद्वारापाशी पोहोचलो. महाद्वारापासीच थोडं दुपारचं जेवण करून आम्ही रायगडावरील शिवकालीन वास्तू पाहण्यास निघालो

Similar questions