निबंध लेखन - आपला लोकप्रतिनिधी कसा
असावा?
Answers
Answer:
नवीन सरकार स्थापन झाले. माध्यमांमध्ये सुद्धा जोरदार चर्चा सुरु आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी आमदारकीची शपथ घेतली. आणि निष्ठापूर्वक काम करणार असल्याचे म्हटले. मात्र महाराष्ट्राचा इतिहास आहे. राजकारणी सत्तेत असो वा विरोधात रंग लवकर बदलतात. आपण जनतेचे सेवक आहोत, मालक नव्हे. ही लोकप्रतिनिधींची भावना असायला हवी. पण अनेक लोकप्रतिनिधी नेमके त्याच्या उलट वर्तन करतात.
नांदेड येथे झालेल्या महाजनादेश सभेत देवेंद्र फडणवीस भाषण देण्यास आले असता त्यांना उपस्थित नागरिकांमधील एकाने कर्जमाफीचं काय झाल?, असा प्रश्न विचारला. फडणवीसांनी नुकतीच भाषणाला सुरवातच केली होती. त्यामुळे सभामंडपात शांतता होती. त्यामुळे त्या युवकाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचला. नाहीतर सामान्य नागरिकाला आपले म्हणणे मांडण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागतो. युवकाने विचारलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर न देता. तू कॉंग्रेसचा आहेस की राष्ट्रवादीचा? असा प्रतीप्रश्न केला. त्यामुळे सभेत गोंधळ उडाला. त्या युवकाला सुरक्षारक्षकांनी सभेबाहेर नेले. फडणवीसांनी त्या युवकाला विरोधी पक्षाचा आहे म्हणून दुर्लक्षित केले. त्याच्या प्रश्नाचे उत्तर टाळूनही फडणवीस गडबडले. त्यांना काही सुचेना त्यामुळे त्यांनी भारत माता की जय , वंदेमातरम’च्या घोषणा सुरु केल्या. ते भाषण समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात ते व्हायरल झाले.
Answer:
I hope answer is helpful to us