India Languages, asked by irshadchoudhary588, 20 days ago

निबंध लेखन जत्रा उत्सव मुश जना कुठे व कावीभरली. जतील पारंपरिक स्वस्त जत्रेतील गळती-जमती आबंदाची पाणी ​

Answers

Answered by 607ajaykumar
0

Answer:

आमच्या गावची जत्रा म्हणजे आनंदाची पर्वणी असते. जवळच्या गावातील खूप लोक येतात. गावातील सगळ्यांचे नातेवाईक येतात. खूप मित्र-मैत्रिणी भेटतात. खूप मजा येते. आमची जत्रा एक दिवसाची असते. पण त्या आधी आठवडाभर गावात उत्साह असतो. गेल्या वर्षी आम्ही जत्रेला गेलो होतो. देऊळ छान सजवले होते. सगळीकडे फुलांच्या माळा व रंगबिरंगी पताका लावल्या होत्या. दिव्यांची आरास केली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते.

देवळाच्या जवळच आणि दुकाने थाटली होती. अनेक मुले फुगा घेऊन तीपण्या वाजवत होती. एके ठिकाणी जादूचे खेळ चालू होते. झटपट फोटो काढण्याचा एक केला होता. मी लाकडाच्या चंद्रकोरी वर बसून फोटो काढून घेतला. आकाश पाळण्यात तर फारच धमाल आली. काहीजण मात्र भीतीने किंचाळत होते. खाण्याच्या ठेल्यावर खूप गर्दी होती. मी भरपूर पाणी पुरी खाल्ली. अशी आमच्या गावची जत्रा आम्हाला खूप आनंद देते

---------------------------------------------------------------------------------------------

मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध क्रमांक २

आमच्या रामपूर गावामध्ये पाऊस महिन्यात देवीचा मोठा उत्सव असतो. ही देवी नवसाला पावणारी असल्यामुळे आजूबाजूच्या गावातून लांबून लांबून आणि भाविक आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येतात. तारा गाव अगदी गजबजून गेलेला असतो. गावातील लोक आधीपासूनच या उत्सवाची तयारी करू लागतात. देऊळ स्वच्छ करणे, रंगरंगोटी करणे, मंडप घालने वगैरे सर्व तयारी केली जाते. देवळाच्या समोर पेढे, प्रसाद, मिठाई, खेळणी वगैरे दुकानाची दुकाने ओळीने मांडलेली असतात. मुलांसाठी मोठे पाळणे, गोल चक्र वगैरे खेळ असतात. तसेच माकडवाला डोंबारी यांचे खेळ पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झालेली असते. पिपाण्या, बँडबाजे, ढोलकी यांच्या आवाजाने सारा परिसर भरून राहिलेला असतो.

उत्सवाच्या दिवशी सर्वांना महाप्रसादाचे जेवण देण्यात येते. गावकऱ्यांना रोजच्या कष्टमय जीवनात या उत्सवा मधून आनंद मिळत असतो. त्यामुळे गावातील लोकांना या जत्रेचे फारच महत्व आणि श्रद्धा भाव इथे प्रकर्षाने दिसून येतो.

Similar questions