Math, asked by madhuratamboli, 10 months ago

निबंध लेखन लिहा मी शास्त्रज्ञ झालो तर write in 2 paragraph In Marathi language

Answers

Answered by Darshana66037
3

Answer:

mi shastrayn zalo tr

Step-by-step explanation:

mi shastrayn zalo tr phila shodh haa lvnar ki aai jr ghri nsli ki zadanna pani n ghalun zad kshi jgvta yeil. karn unhaa mdhye handpump la pani nahi yet trihi mazi aani ashya kittek striya tay panyachi wat pahtat fkt zadabsathi tyanch mhnane aahe ki zade asli tr aapn asu tya zada sathi kiti ksht gete mazi aai mhnun maza phila shodh haach asnar .

dusra shodh bhuk nko lagel as kahi chemical asayla pahije aaj aapli stiti jipn aahe srv bhukemulech zali aahe bhuke mule lhan mul bhik mangtat, chori krtat , nko ti kame krtat jr hi bhuk nsli tr naa aaj aamcha desh America sarkha asta pn aavshyak vstu purvnyat aamcha bhrtiy guntun jato tr To kuthe lkshy deto ki tiptop cha arth tyala kltch nahi mhnun shastrayn zalyavr aayushy jri gel. tri chalel pn hech don shodh krnar.

jay hind

Answered by riyanadcunha15
16

Answer:

\huge{\underline{\sf{\pink{ᏗᏁᏕᏇᏋᏒ:-}}}}

मी शास्त्रज्ञ झालो तर

छोट्याशा आयुष्यात किती अन् काय काय करतो नाही, माणूस? आणि तरीसुध्दा बरंच काही करायचं निसटतंच त्याच्या हातातून. मग आयुष्यभर रुखरुख लागते मनाला, जशी माझ्याही मनाला लागलीय. पण ती बोचणारी किंवा पश्चातापाची नाही. कारण माझ्या करायच्या अनेक गोष्टी राहिल्या असल्या तरी, त्यांची माझी साथ सुटलेली नाही. करिअर म्हणून त्या माझ्या व्यावसायिक जीवनाचा भाग नसतील बनल्या कदाचित! पण छंद-आवड म्हणून माझ्या जीवनाचा मोठा भाग त्या आजही व्यापून आहेत.

अशा किती तरी गोष्टी होत्या, ज्यात मला करिअर करता आलं असतं. कारण इतिहास, पुरातत्त्व, चित्रकला, छायाचित्रण, संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य अशा अनेक गोष्टींंत मला रस होता. मी ज्यांच्याकडे लहानाचा मोठा झालो त्या जोगळेकर दाम्पत्याने (माझी आत्या आणि तिचे डॉक्टर पती) लहानपणी माझं कुतूहल, माझ्या शंका, माझ्या आवडनिवडींना अशा पद्धतीने जोपासलं की, मला शास्त्र-कला साऱ्यांतच रुची निर्माण झाली. मी एखाद्या विषयाबद्दलची आवड व्यक्त करायची खोटी, डॉ. जोगळेकर त्या विषयासंदर्भातली ऑथेन्टिक माहिती पुरवणारी साधनं माझ्यासमोर हजर करत. वाढत्या वयात असे सांस्कृतिकदृष्ट्या संगोपन करणारे पालक भेटल्यामुळेच माझं आयुष्य उजळून निघालं. आणि आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी सांगतो की, मी नेहमीच एक हुशार विद्याथीर् होतो नि आहे. त्यामुळे मला रस नाही, असा विषय तेव्हा जवळजवळ नव्हताच.

मात्र या सर्वच विषयांत रस असला, तरी त्यात करिअर करावं असं मात्र मला कधी वाटलं नाही. कारण यातल्या बऱ्याचशा माझ्या व्हेकेशन हॉबी होत्या. आणि तरीही मी व्हायचं नसताना छायाचित्रकार झालो, लेखक झालो, पटकथालेखक झालो, अगदी पाश्चात्य ऑपेरा संगीतचा उत्तम जाणकार आणि संग्राहकही झालो. पण खरंच सांगतो मला यातलं काहीच व्हायचं नव्हतं.

मला व्हायचं होतं सायंटिस्ट. एक शास्त्रज्ञ. त्यासाठीच सेंट झवियर्स महाविद्यालयात विज्ञानशाखेत प्रवेश घेऊन मी माझ्या आवडीचा बायो-केमिस्ट्री विषय घेऊन बी.एस्सी. केलं. पुढे मला याच विषयात एम.एसस्सी. करुन पीएचडीही करायचं होतं. या विषयाची मला एवढी आवड होती की, मी सेंट झेवियर्स महाविद्यालयात दोन वर्ष हा विषय शिकवलादेखील. अन् तरीही केमिस्ट्री हा विषय पुढे कंटिन्यू करून मी शास्त्रज्ञ नाहीच होऊ शकलो. कारण एरव्ही सर्वच विषयांत प्रोत्साहन देणारी माझी आत्या, केमिस्ट्रीत एम.एसस्सी.-पीएच.डी. करायला मात्र नको म्हणाली आणि मग ते राहूनच गेलं.

मी फोटोग्राफीसाठीचं सगळं तंत्र लिंटासमधल्या त्या नोकरीतच शिकलो. तिथे हळूहळू फोटोग्राफी हेच माझं मुख्य काम बनलं. लिंटासमध्ये मी पंधराएक वर्ष होतो. याच दरम्यान मी एकदा माझी कॉलेजमैत्रीण असलेल्या शबाना आझमीचे काही फोटो शूट केले. ते तिला एवढे आवडले की, नंतर तिने फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेकांना माझ्याकडे पाठवायला सुरुवात केली आणि मग तेच माझं प्रोफेशन झालं.

सिनेमाच्या प्रारंभकाळातल्या अभिनेत्री दुर्गा खोटे यांच्यापासून ते रेखा-ऐश्वर्या, सलमान-रणबिर कपूरपर्यंत कित्येकांची मी छायाचित्रं काढली. ही छायाचित्रं काढताना त्यांचं व्यक्तिमत्व छायाचित्रात आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी या सगळ्यांशी बोलावं लागायचं, त्यांच्याशी संवाद साधावा लागायचा, तेव्हा कुठे ते मोकळे व्हायचे आणि मला छायाचित्रासाठी आवश्यक ते मिळून जायचं. छायाचित्रांच्या निमित्ताने सिनेकलावंतांशी संबंध येऊ लागला, त्यांच्याशी संवाद होऊ लागला आणि मग माझ्याकडे त्यांच्या आठवणींचा, आवडी-निवडींचा एक अनमोल खजिनाच जमा झाला. मग माझ्या बहिणीच्या म्हणजे शोभा डे (आधीची राजाध्यक्ष)च्या आग्रहाखातर सगळ्यात आधी ती संपादिका असलेल्या 'सेलिब्रिटी'साठी लिहिलं. नंतर अनेक इंग्रजी मासिकांत लिहिलं. पण लिहिण्याची खरी मजा आली ती, 'चंदेरी' या मराठी सिनेपाक्षिकात लिहिताना. ते केवळ लिहिणं नव्हतं. ते त्या कलाकारांच्या अंतरंगात डोकावणं होतं. मी चंदेरीचा सल्लागार संपादकही होतो. त्यामुळे 'चंदेरी'त लिहिताना मजा यायची.

तेव्हा सायंटिस्ट व्हायला मला आवडलं असतं, हेच खरं! मात्र ते होता आलं नाही, याचं दु:ख नाही. कारण प्रत्यक्षात सायंटिस्ट झालो नाही, किंवा बायो केमिस्ट्रीशी माझा प्रत्यक्ष टच राहिलेला नसला, तरी त्या क्षेत्रातलं माझं ज्ञान नेहमी अद्ययावत असतं. कुठली नवी कंपाउंडस् आली, वेगवेगळ्या लॅबमध्ये कुठले नवे प्रयोग सुरू आहेत, ते मी सतत वाचत असतो. एवढंंच नाही, तर डॉ. जोगळेकरांच्या सहवासामुळे आणि त्यांनी तेव्हा दिलेल्या टिप्समुळे कुणी लक्षणं सांगितली, तर मी केलेलं डायग्नोसिस सहसा चुकत नाही.

म्हणजेच प्रत्यक्षात सायंटिस्ट झालो नाही तरी, त्यात असलेला इंटरेस्ट मी अजून जपलाय. त्यामुळेच प्रत्यक्ष सायंटिस्ट होणं राहून गेलं तरी, आवडीच्या रूपाने ते प्रोफेशन मी एकप्रकारे जपलंच आहे, नाही का?

Step-by-step explanation:

\bf\star\underline\purple{ Hope \:  it \:  works \:  for  \: you☺☺}

\bf\star\underline\red{ ᏕᏖᏗᎩ \:  ᏂᏗᎮᎮᎩ  \: ᏗᏁᎴ  \: ᏰᏝᏋᏕᏕᏋᎴ☺❤}

Similar questions