निबंध लेखन
- माझा आवडत ऋतु
-माझा भारत देश
- माझा आवडत पक्षी
Answers
Explanation:
आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. या सर्व ऋतूंमध्ये माझा आवडता ऋतू म्हणजे हिवाळा !हिवाळ्याच्या दिवसात उबदार पांघरुणात झोपायला फार मजा येते; पण त्याचवेळी रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांचीही आठवण येते. हिवाळा हा स्निग्धतेचा, प्रेमाचा ऋतू आहे. म्हणून या दिवसात अनेक स्नेहसंमेलने साजरी होतात.
पावसाळ्यात भरपूर पाणी मिळाल्याने या ऋतूत निसर्ग तृप्त असतो. त्यामुळे भोवतालची सृष्टी नयनरम्य असते. या दिवसात पहाटे सर्वत्र धुके पडते. अशा वातावरणात अनेकजण उबदार गरम कपडे घालून सकाळी भटकायला निघतात. याच ऋतूत पक्षी स्थलांतर करतात.
हिवाळ्यात नाताळ हा सण येतो. सांताक्लॉज वेगवेगळ्या भेटी देतो. शाळेलाही सुट्टी असते. याच ऋतूत मकरसंक्रांत येते. हा सण मला फार आवडतो. सर्व माणसे एकत्र येतात. तिळगूळ एकमेकांना वाटतात. संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू करतात. उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ या ऋतूला आवश्यक असतात. हिवाळ्यात काम करायला उत्साह वाटतो. या ऋतूत शेतावर हुर्खापार्टी होते. गावोगावी जत्रा भरतात. असा हा आपुलकी वाढवणारा ऋतू मला फार आवडतो.
मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्सा.
माझा भारत देश
भारत हा माझा देश आहे. माझा देश खूप सुंदर आणि महान आहे. हा देश संपूर्ण विश्वामध्ये एक प्रसिद्ध देश आहे. माझा भारत देश हा सर्व देशांचा मुकुट आहे. लोकसंखेच्या दृष्टीने माझ्या भारत देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. माझा भारत देश विविधता आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो.
कारण या देशाची संस्कृती अन्य देशांच्या तुलनेने सगळ्यात वेगळी आहे. माझा भारत एक असा देश आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. माझा भारत देश सर्वात विशाल देश आहे.
माझ्या भारत देशाचा इतिहास हा संघर्षवादी आहे. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर क्रांतीवीरानी आपल्या प्राणांची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.
त्यांना भारत देशासाठी अनेक संघर्ष करावा लागला, आपले प्राण गमवावे लागले. माझा भारत देश १५ ऑगस्ट, १९४७ साली ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारी, १९५० साली भारताचे संविधान लागू झाले.
माझ्या भारताचा भूगोल हा विशाल आहे. भारत देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. तसेच माझ्या भारत देशाला लांब लचक समुद्र किनारा लाभला आहे. त्याच बरोबर गंगा, यमुना, रावी, सतलज यांसारख्या नद्यांमुळे माझा भारत देश सर्वगुण संपन्न झाला आहे.
माझा आवडत पक्षी
मोर हा माझा आवडता पक्षी आहे आणि आज मी आपल्यासाठी मोर ह्या पक्षी वर एक सुंदर मराठी निबंध आणला आहे. आणि तो तुम्हाला नक्की आवडेल आहे मला अशा आहे.
मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात आणि मोर सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बगीतला कि बगतच राहाव असे वाटते, महुणून तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे.
मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होतो आणि मनात येते ती म्हणजे लहानपणी ची कविता "नाच रे मोर.." जी आपण सर्वेच लहापानी गातो. मोराचे ते सुंदर हिरवे-निळे पंख, त्यच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल. ह्याच गोष्टी मुळे मोर एकदम रुबाबात चालतो.
मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुधा आहे. मोर शेत नस करणारे उपद्र्वि प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना तो खातो व शेताची रक्षा करतो. मोर असल्याने बोगांची तसेच वनांची शोभा वाढवतो.
मोराचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला कि तो सुंदर पिसारा फुलून नुर्त्य करतो. त्यचा तो नाच बाग्न्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात.
मि मोराची कूप चित्रे जमवली आहेत. मला मोर हा खूप खूप आवडतो आणि मोर माझा आवडता पक्षी आहे.