India Languages, asked by teejaparmar111, 6 months ago

निबंध लेखन:
मुलींचे शिक्षण
प्रगतीचे लक्षण​

Answers

Answered by Anonymous
14

Answer:

Campus Jugaad

निबंध • शैक्षणिक

मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण मराठी निबंध, भाषण- Education for Girls

by Ajay Chavan

4 min read

जुलै 1, 2020

‘एक सुशिक्षित आई ही शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे,’ हा आपल्या राष्ट्रपित्याचा संदेश अनमोल आहे. कारण ज्या घरातील स्त्री शिकलेली आहे, ते घर कधीच अशिक्षित राहणार नाही. तरीपण आजही देशातील स्त्री- साक्षरतेचे प्रमाण हे पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ह्या लेखामध्ये आम्ही मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण, काळाची गरज, समाजाचे रक्षण, मुलगी शिकली प्रगती झाली ह्या विषयांवर माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण, काळाची गरज, समाजाचे रक्षण, मुलगी शिकली प्रगती झाली ह्या विषयांवर मराठी मध्ये निबंध, भाषण, लेख, परिच्छेद लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण मराठी निबंध, भाषण

खरं पाहता, आज महाराष्ट्र शासनाने मुलींना पहिलीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली आहे. त्याशिवाय ‘सावित्रीबाई दत्तक बालक’ योजनेतून तिला शिक्षणासाठी येणाऱ्या इतर खर्चासाठी मदत मिळू शकते. त्यामुळे आज शहरातून मुली, स्त्रिया शिक्षण घेताना आढळतात. आज कित्येक कर्तबगार स्त्रिया जबाबदारी पदे सांभाळत आहेत. कर्तृत्वाचे कोणतेही क्षेत्र आज स्त्री हुशारीने सांभाळू शकते, हे स्त्रीने सिद्ध केले आहे. तरीही आपल्या देशातील स्त्रीशिक्षणाची समस्या कठीण का झाली आहे?

आपल्या देशात महिलांची भरारी ही डोळ्यात भरणारी असली तरी आपल्या देशात महिलांना काही ठिकाणी अन्याय सहन करावा लागत आहे. आणि यावर उपाय म्हणजे महिलांनी न घाबरता न डगमगता सर्व अन्यायांवर मात करणे. या सर्व अन्यायांवर मात करण्यासाठी तसेच लढण्यासाठी सर्व स्त्रियांनी शिक्षण घेण्याची गरज आहे. म्हणजेच आपल्या देशातील १०० टक्के स्त्रिया जर सुशिक्षित झाल्या तर या सर्व गोष्टी, महिलांवरील अन्याय कमी होतील.

शिक्षणाशिवाय महिलांची प्रगती होणे अशक्य आहे. या सर्व अन्यायांचा सामना करण्यासाठी शक्ती, बळ हे फक्त शिक्षणामुळेच स्त्रियांमध्ये येऊ शकते. शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा प्रमुख स्रोत आहे. एखादी स्त्री, मुलगी शिकली तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब शिकते. त्यामुळे सर्व पुरुषांनी स्त्री शिक्षणाचे महत्व समजून घेऊन आपल्या मुलींना शिकवले पाहिजे.

‘किशोरी प्रशिक्षण’ या प्रकल्पामुळे आता स्पष्ट झाले आहे की, स्त्रीशिक्षणात अनेक अडथळे आजही उभे आहेत. वर्षानुवर्षे आपल्या समाजात स्त्रीला शिक्षणासाठी विरोधच होता. चूल आणि मूल सांभाळायला शाळेत कशाला जायला हवे, अशी मनोधारणा होती. स्त्रीवर अनेक बंधने होती. आजचा समाज या समजुतीतून थोडा थोडा बाहेर पडला आहे. तरीपण ग्रामीण भागात स्त्रीशक्षणाच्या बाबतीत उदासीनता दिसून येते.

मुलींनी शिकावे यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. जसे की सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मोफत गणवेश, मोफत पुस्तके, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, तसेच लेक वाचावा लेक शिकवा अशा प्रकारच्या अनेक योजना राबवून मुलींना मोफत शिक्षण दिले जाते.

ग्रामीण भागातील पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत म्हणावी तितकी जागरूकता दिसून येत नाही. स्वतः निरक्षर असल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व माहित नसते. पण हेच निरक्षर पालक आपल्या पोटाला चिमटा घेऊन मुलाला शिक्षणासाठी पाठवतात. मुलींचे शिक्षण मात्र काहीतरी कारणावरून थांबवतात. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा असेल त्यावर्गापर्यंतच शिक्षणाची परवानगी मुलींना दिली जाते. आजच्या या आधुनिक काळात शिक्षणाला एवढे महत्व असतानाही हे पालक आपल्या मुलींना शिकवत नाहीत पण त्यांना जेव्हा या शिक्षणाचे महत्व कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

Explanation:

if it is useful to you then please FOLLOW me i will help you when you need to MARK it as BRAINLIEST please

Similar questions