निबंध लेखन पारितोषक सोहळा
Answers
Answer:
काल दिनांक १५ डिसेंबर रोजी अमरावती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
Explanation:
विविध स्पर्धांचे
पारितोषिक वितरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने आय़ोजित केलेल्या आंतरशालेय चित्रकला आणि निबंध स्पर्धा; तसेच जिल्हास्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. या स्पर्धेत पुणे शहरातील २९ शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. जिल्हास्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १५ शाळांतील शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे, महासंघाच्या माजी अध्यक्ष नंदा माने, माजी सचिव सुचेता पाताळे, मुख्याध्यापिका उज्ज्वला गायकवाड, अविनाश ढुमे, उद्योजक रणजित हारपुडे, प्रतापसिंह शिंदे, संगीता आंग्रे, शीतल इंगुळकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत मीनाक्षी मेमाणे समगीर (प्रतिभा पवार विद्यामंदिर), दत्तात्रय येवले (रामभाऊ म्हाळगी विद्यालय), राजश्री पाठक (शिशुविहार प्राथमिक शाळा) ललिता कारंडे (भावे प्राथमिक शाळा), रंजना शिंदे (बी. टी. शहानी नवीन हिंद प्राथमिक शाळा) यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित शाळांच्या मुख्याध्यापकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष नारायण शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम करंजावणे, जितेंद्र पायगुडे, रेवण पवार, संजय घोडके,विकास थिटे, मारुती माळवदकर, संदीप सातपुते, वैशाली शिंदे, प्रकाश राऊत, विकास मोरे, उमेश पोदकुले आणि संजय कुलाल यांनी विशेष परिश्रम घेतले. सोपान बंदावणे यांनी सूत्रसंचालन केले, तर जानेश्वर गायकवाड यांनी आभार मानले.