India Languages, asked by ShravniGaikwad, 2 months ago

निबंध लेखन दिलेल्या विषयावर ​

Attachments:

Answers

Answered by Nishantjha432
1

Answer:

Explanation:

घड्याळ नसते तर काय झाले असते, ऐकून भीती वाटते? जर घड्याळ नसेल तर किती वाजले हे कसे कळणार. घड्याळ बंद पडले तर सकाळचा गजर कसा होणार? किती भीतीदायक वातावरण असेल, नाही का? आजच्या निबंधाचा, भाषणाचा विषय हाच आहे “घड्याळ नसते तर”. या लेखाची सुरवात भाषणाने केली आहे, बाकी माहिती निबंधाच्या फॉरमॅट मध्ये आहे. तुम्ही तुमच्या गरजे नुसार दिलेल्या माहिती मध्ये बदल करू शकता. चला तर मग घड्याळ नसते तर मराठी निबंध, भाषण, लेख सुरु करूया .

घड्याळ नसते तर मराठी निबंध (Essay)

वेळ अमूल्य आहे, वेळ म्हणजेच पैसा; असे आपण खूप वेळा ऐकलं आहे. आपण ठराविक वेळेत शाळेत येतो, ठराविक वेळेचे लेक्चर्स असतात. शनिवारी तर सकाळची शाळा असते, नेहमीपेक्षा लवकर उठावे लागते, नाही का? कल्पना करा जर घड्याळ नसतेच तर, किंवा घड्याळ बंद पडले तर. याच विषयावर मी आज तुमच्या समोर बोलणार आहे.

घड्याळाचे फायदे

खरंच घड्याळासाठी आपण की आपल्यासाठी घड्याळ हेच कळत नाही इतके आपले जीवन घड्याळाशी बांधले गेले आहे. आपल्या या मनुष्यजन्मात घड्याळाला अनन्यसाधारण महत्व आहे. माणूस जन्मल्यापासून ते मरेपर्यंत त्याचे घड्याळाशी नाते घट्ट असते. आपले जीवन हे घड्याळाच्या काट्याबरोबर बांधलेले असते.

विद्यार्थीदशेत घड्याळ पाहून अभ्यास, खेळ यांची दैनंदिनी बनवली जाते. घड्याळ पाहून शाळेत येणे, जाणे, नाष्टा करणे, एवढेच नव्हे तर जेवण सुद्धा आपण या घड्याळाच्या काट्यावर करतो. म्हणजेच दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सर्व कामे ही घड्याळावर अवलंबून असतात.

घड्याळाचे काम काय असते? वेळ दाखवणे. किती वाजले, किती तास, मिनिटे झाली. या साध्याश्या यंत्रामुळे आपलं दैनंदिन जीवन सुखकर होते. साल १९२७ मध्ये वॉरेन मार्रीसोन आणि ज.व. हॉर्टन यांनी बेल टेलेफोन लॅबोरेटरी मध्ये क्वार्ट्ज (quartz) घड्याळाचा शोध लावला. क्वार्ट्ज हा एक क्रिस्टल ऑसीलेटर किंवा आंदोलक आहे, जे अतिशय तंतोतंत वारंवारितेसह सिग्नल तयार करते, ज्यामुळे क्वार्ट्ज ची घड्याळे यांत्रिक घड्याळांपेक्षा अचूक सिग्नल्स देतात. क्वार्ट्ज ला सिलिकॉन डायओकसाइड सुद्धा म्हटले जाते आणि हे एक पीएझोइलेक्ट्रिक मटेरियल आहे. या तंत्राने माणसाचे जीवन सुखकर बनवले.

जर आज घड्याळ बंद पडले तर (कायमचे)

कुठल्याही वस्तूची, अनुभवाची आपल्याला सवय होते, आणि ती अचानक बंद झाली, थांबली तर कोणाचीही अव्यवस्था होणार. तसेच, घड्याळाचे आहे. जर घड्याळ कायमचे बंद पडले तर, आपल्याला वेळ कळणार नाही, सर्व कामाच्या वेळा चुकतील. वेळाची नोंद ठेवावी लागेल, सकाळी उठवण्यासाठी क्लॉक / गजर नसेल, सूर्य देवावर आपण अवलंबून असू. परत एकदा आरवणारा कोंबडा पाळावा लागेल.

या सर्वाने अडचण, त्रास नक्कीच होईल पण माणूस हा एक झुंजारू प्राणी आहे, आपण हळू हळू याची सवय करून घेऊ. विसरू नका की, माणूस ही प्रजात त्याच्या बुद्धीसाठी ओळखली जाते, कोणीतरी वेळ मोजण्याचा नवीन प्रकार अवगत करेल.

Similar questions