India Languages, asked by arpitajjoshi, 4 months ago

निबंध मी जिल्हा आधिकारी झालो तर....

Pls answer fast in marathi plz... Anyone​

Answers

Answered by Sauron
11

निबंध लेखन -

\rule{300}{1.5}

उत्तर :

समाजात होणाऱ्या घटनांमुळे आपण एकमेकांना दोष देऊन ,चर्चा करून मोकळे होतो. गावची परिस्थिती आणि त्यांच्या समस्या याबद्दल चर्चा करत बसतो. या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करून प्रश्न सुटणार नाही तर त्यासाठी काही उपाय योजना करावी लागेल याचा विचार करतो का? कारण आपल्या आजूबाजूला तसेच खेडोपाडी विकास घडवून आणायचं असेल तर त्यासाठी काही ठराविक अधिकार असावे लागतात.

मी विचार केला मी पण हे करू शकतो.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकास घडवून आणायचा असेल तर मला जिल्हाधिकारी व्हावे लागेल.

खरंच, मी जिल्हाधिकारी झालो तर!

जिल्हाधिकारी हा राज्य सरकारचा जिल्ह्यामधील सर्वोच्च अधिकार संपन्न प्रतिनिधी आहे. संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचे काम जिल्हाधिकारी करतो. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेन.

मी प्रथमत: मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष देईल. अर्थात माझी कामे सरकार ठरलेली आहेत तरी त्या व्यतिरिक्त मी सामान्य नागरिकांना मदत दायी ठरेल अशी कामे करेन. अनेक खेड्यांमध्ये पाणी आरोग्य शिक्षण आणि निवारा सुरक्षा वीज पुरवठा इत्यादी सुविधा सामान्य नागरिकांसाठी योजना बनवलेल्या असं त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यांचा लाभ घेण्यासाठी मी त्यांना मदत करेन अर्थात त्यांच्याकडे पोहोचत आहेत की नाही यावर विशेष लक्ष देईल.

शिक्षण विषयक सुविधांमध्ये शाळा महाविद्यालय व्यवस्थित सुरू आहेत की नाही तसेच शाळा महाविद्यालय आहेत पण शिक्षक उपलब्ध नसतात त्यांच्या उपलब्धतेसाठी मला योग्य ती कारवाई करावी लागेल आणि ती मी अवश्य आणि योग्यरीत्या करेन.

दुष्काळग्रस्त भाग तसेच पाण्याची कमतरता असलेला भाग यामध्ये पाण्याचे टॅंकर पोहोचविण्यासाठी मान्यता देईल. दुष्काळामध्ये सर्वांचे हाल होतात सर्वात मोठ्या प्रमाणात निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याचे. महाराष्ट्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा फायदा मिळतो की नाही तसेच त्या योजना शेतकर्‍यांकडे कशा पोहोचविता येतील याकडे लक्ष देण्यासाठी मी जातीने प्रयत्न करेन.

सरकारी नोकरी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना आढळून येतो तो टाळण्यासाठी गुन्हेगारास शिक्षा तसेच तो होऊ नये म्हणून सतत काळजी घेण्यासाठी सर्वांना निवेदन करेन.

जिल्ह्यांमध्ये निसर्गनिर्मित किंवा इतर समस्या उपलब्ध झाल्यास जसे भूकंप इत्यादी लोकांना निवारा अन्न आरोग्य विषयक सोयी यांची उपलब्धता करून देणे माझे कर्तव्य आहे.

जिल्ह्यामध्ये शांतता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य तो प्रयत्न करेन. गावोगावी दौरे काढून तेथील परिस्थितीचा आढावा घेईन. कारण गाव ,जिल्हा, राज्य यांचा विकास झाला तर अप्रत्यक्षरीत्या देशाचा विकास निश्चित आहे.

जिल्ह्याचा विकास आणि प्रगती घडवून आणण्यासाठी योग्य प्रकारे सर्वांचे मत विचारात घेऊन आवश्यक तो निर्णय घेईल .

Similar questions