Hindi, asked by nchandane34, 4 months ago

निबंध माझी आवडती कला चित्र काढणे​

Answers

Answered by naveenkumarmu23
11

Answer:

माणसाला जगायला शिकवते ती म्हणजे कला आणि कला ‘माणूसपणाकडे’ नेण्याची पायवाट आहे. त्यांच्या जगण्याला एक उंच खोली देते. दररोजच्या कंटाळवाण्या -हाट गाडयातून एक हवाहवासा वाटणारा विरंगुळा म्हणजे कला, विरूप जगण्याला सौंदर्य प्रदान करते ते म्हणजे जगणे आणि हेच जगणे अधिकाधिक सुसह्य होत जाते आणि विशेष म्हणजे अपरिहार्य दु:खाचा विसर पाडतात, त्याविषयी एका कवीने म्हटले आहे की-

या दु:खाच्या बाता, गाण्यात गाता

जातील विरूनी गाडया!

या दु:खाचं काय, जागोजागी याचेच पाय

जखमांवरती थोडीशी फुंकर, मायेची साथ!

अशा भरभरत्या जखमेवर फुंकर घालण्याचे काम या साऱ्या कला करतात. कला हा विरंगुळा नसून माणसाला, समाजाला, सुसंस्कृत, संवेदनशील व विचारप्रवण बनवते. तसेच विरंगुळा हा कला निर्मितीचा एक ‘बाय प्रोडक्ट’ आहे. तरीही अभिव्यक्त होण्याच्या अनिवार्यतेतून कला निर्मिती होते.

तशीच एक कला माझ्याही अंगी अवगत आहे. ती म्हणजे चित्रकला. चित्र व माझे नाते जन्मोजन्मीचे आहे, असे मला वाटते; परंतु त्या चित्रकलेचे महत्त्व त्या वेळी माहीत नसल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. तसेच आई-वडिलांचेही माझ्या कलेकडे लक्ष नसल्याकारणाने तेही प्रोत्साहन करण्यास उत्सुक नव्हते. मी सुट्टीच्या दिवशी नेहमीच चित्र काढायची.

कमी वेळेत जास्त चित्रे काढून व रंगवून होईल. हे चित्र काढणे किंवा रंग- रंगोटी करणे हे मी बेडरूममध्ये लपून करत असे, याचं कारण असं की, हे चित्र आईने पाहिले तर प्रवचन देण्यास सुरुवात करेल ‘की इतके तास तू हे काम करत होती का? हे काय आहे? किती पसारा हा! सर्व ठिकाणी रंग सांडून ठेवतेस. त्या वेळातच अभ्यास केला असता तर विषयात टक्केवारी वाढली असती आणि हा पसारा तरी पडला नसता’, ती म्हणत असे. या कारणाने माझे कलेकडे दुर्लक्ष झाले होते. तशी अनेक चित्रं मी काढायची; परंतु मनापासून ते साकार होत नव्हते. कारण मला प्रोत्साहन देणारे त्यावेळी कोणीही नव्हते.

शाळेत असल्यापासून मी विविध स्पर्धाना जायचे. स्पध्रेत विविध शाळेची भरपूर मुलं सहभागी होत असत. विद्यार्थाचा परिचय होत असे. प्रत्येक स्पर्धा ही माझ्यासाठी आठवण म्हणून मनात

Similar questions