India Languages, asked by jaykishorsharma36, 19 days ago

निबंध माझा आवडता प्राणी​

Answers

Answered by s1742gopi12944
5

Explanation:

कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे. कुत्र्या इतका इमानदार कुठलाच प्राणी नाही. कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो तसेच कोणी अनओळखी माणूस आपल्या घरा जवल आला तर तो लगेच भुंकून इशारा देतो. म्हणूनच लोक आपल्या घरात कुत्रा पळतात.

मला पण कुत्रे फार आवडतात माल कुत्र्यांन विषयी फारशी माहिती आहे, आणि मी सुद्धा एक कुत्रा पळला आहे. माझ्या कुत्र्याचे नाव "प्रीन्स" आहे, तो जर्मन शेपर्ड ह्या जातीचा कुत्रा आहे. प्रिन्स दिसायला खूप सुंदर दिसतो पण तो तितकाच घातक पण आहे. सोमोर प्रिन्स दिसला कि कोणीही अनओळखी माणूस त्याच्या समोर येण्याची हिंमत करत नाही, त्याला बघून सर्वे घाबरतात.

माझा कुत्रा प्रिन्स माझ्या कडे अगदी तो लहान होता तेव्हा पासून आहे. मला कुत्रे फार आवडतात म्हणून माझ्या बाबांनी माझ्या वाढदिवसाला मला हा कुत्रा भेट म्हणून दिला होता. आता पर्यंत हि माझी सर्वात आवडती भेटवस्तू आहे. प्रिन्स ला आता सात वर्ष झाली आहेत आणि तो एक केवळ प्राणी नसून तो आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.

प्रिन्स सर्वांचाच लढका आहे त्याची त्याची आणि माझी फार चांगली मैत्री आहे, जे मी सांगेन तो ते ऐकतो. त्याला बस सांगितले कि बसतो आणि उठ सांगितले कि उठतो. त्यला जर मी प्रिन्स "गो" म्हणाला आणि हातातचा इशारा दिला कि समोरच्याचे काही खरे नाही, तो इशारा मिळताच भुंकत धावून जातो. आणि मी सांगितले कि एका आवाजात तो शांत होतो.

प्रिन्स ला सांगितले शेक ह्यांड कि तो लगेच बसतो आणि आपला एक हात वर करतो आणि समोरच्या व्यक्तीच्या हातात हात देतो आणि त्याची जीभ बाहेर काढतो. माझा कुत्रा प्रिन्स हा खूपच प्रेमळ कुत्रा आहे तो माझ्या वर खूप प्रेम करतो. त्याचे केस खूप सुंदर आहेत आणि मोठे सुद्धा मी त्याला दर दोन आठवड्याने आंघोळ घालतो.

प्रिन्स खूप हुशार आहे त्याचे कान नेहमी उभे असतात कोणी अनओळखी आले कि तो लगेच भुंकून इशारा देतो त्याचे नाकाची गोष्टच वेगली आहे कुठलीही वस्तू त्याला लगेच वास घेऊन कळते. क्रिकेट खेळताना तो लगेच बोल शोधून आनतो. कधी घराच्या बाहेर गेले आणि उशिरा घरी येतात तित पर्यंत प्रिन्स आमची वाट बागात राहतो. माझी आजी प्रिन्स चे खूप लाढ करायची जेव्हा आजी वारली (मेली) तेव्हा घरी सर्व रडत होते आणि प्रिन्स सुद्धा रडत होता तो वेगलाच आवाज काढत होता ज्यात तो दुखी आहे असे जाणवत होते.

असा हा कुत्रा फारच हुशार असतो तो एक अत्यंत प्रेमळ आणि इमानदार प्राणी आहे त्याच्या कडे कुठली हि वस्तू वास घेऊन शोधण्याची शमता आहे म्हणून आर्मी आणि पोलीस कुत्रा पाळतात कुत्र्याच्या ह्याच गुनान मुळे कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे.

समाप्त.

तुम्ही कुत्रा पळला आहे का ? तो कोणत्या जातीचा आहे त्याचे नाव काय आम्हला खाली comment करून नक्की सांगा. तसेच हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. माझा आवडता प्राणी कुत्रा हा निबंध खाली दिलेल्या विषयावर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

Similar questions