निबंध माझे आवडते शहर
Answers
Answer:
माझे शहर मराठी निबंध मी 5 वर्षांचा असल्यापासून मी दिल्ली मध्ये राहतो आणि या शहराच्या पूर्ण प्रेमात आहे. इथले जीवन वेगवान आहे, इथले लोक आयुष्याने परिपूर्ण आहेत आणि आपणास येथे मिळणारे भोजन अगदी छान आहे. भारताची राजधानी दिल्ली ऐतिहासिक भूतकाळातील आणि सुंदर इमारतींना उत्तेजन देते. दिल्लीचा ऐतिहासिक भूतकाळ दिल्लीचा इतिहास १२ व्या शतकाचा आहे. हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्वात जुनी वस्ती असलेली शहरे म्हणून ओळखली जाते.
Explanation:
Hope it helped u dear frnd...
Explanation:
देशातील अनेक शहरांपेक्षा हे शहर सुंदर आहे. नियोजनबद्ध आहे मात्र येथील लोकप्रतिनिधींकडे शहराचा कल्पनाविस्तार करणारे व्हिजन नाही.
देशातील अनेक शहरांपेक्षा हे शहर सुंदर आहे. नियोजनबद्ध आहे मात्र येथील लोकप्रतिनिधींकडे शहराचा कल्पनाविस्तार करणारे व्हिजन नाही. त्यामुळे रस्ते, पाणी, वीज यांच्यापलीकडे येथील नगरसेवक जाताना कधी दिसले नाहीत. शहराचे बिग पिक्चर पाहिले गेलेले नाही. त्यामुळे सीबीडी येथे असलेले पाच हजार एकर जागेवरील नेचर पार्क कोणाला माहीत नाही. रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या नेचर पार्कसाठी एखादा नगरसेवक भांडताना किंवा पालिका काही योजना आखत असल्याचे दिसून येत नाही. ते जे एक व्यापक व्हिजन लागते ते दिसून येत नाही. त्याची खंत वाटते. अखेर आम्हीच ही बाब सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या निदर्शनास आणली. त्यांनी वीस कोटी रुपये खर्च करून हे पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहराच्या कुशीत अशी अनेक ठिकाणे आहेत पण ती विकसित करण्याची स्वप्ने कोणी पाहताना दिसत नाही. आणि कोणी याची वाच्यता करीत असेल तर ती पूर्ण करण्याचा दृढनिश्चय दिसून येत नाही. सर्वच गोष्टी सर्वाना कळतात असे नाही पण जे आपल्याला कळत नाही, ते इतरांकडून समजवून घेऊन जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम नगरसेवक करू शकतात, पण ही तळमळ एकाही नगरसेवकात दिसून आली नाही. शहरात सरकारने सिडको निर्मित इमारतीसाठी अडीच व गावांसाठी चार एफएसआय मंजूर केला आहे. त्यामुळे शहर आता नवीन कात टाकणार आहे. लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे हे एफएसआय म्हणजे काय आहे, त्याचा आपल्या नागरिकांना कसा उपयोग होईल हे उमजून घेण्यासाठी एक नगरसेवक वगळता इतर कोणताही लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत नाही. केवळ आपला प्रभाग आणि तेथील नागरी कामे एवढय़ापुरते मर्यादित असणारे हे नगरसेवक शहराचा व्यापक विचार करणार कधी, असा प्रश्न पडतो. त्यामुळे सुशिक्षित, एखाद्या विषयाचा चांगला अभ्यास, शहर सुंदर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नगरसवेकांना जनतेने सभागृहात स्थान दिले पाहिजे.
– दिनकर सामंत, शहर नियोजनकार