निबंध मी पाहिलेला बाग
Answers
Answer:
रविवारची सुट्टी असल्यामुळे आई बरोबर मी बागेमध्ये गेले होते. या बागेचे नाव फुलबाग असे आहे. बागेची आवर खूप मोठे आहे. सभोवताली गुलमोहराची झाडे लावलेली आहेत. झाडांच्या सावलीत लोकांना बसण्यासाठी बाके ठेवलेली आहेत. बागेमध्ये सुंदर हिरवळ तयार केलेली आहे. ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे फुलझाडे लावली आहेत. बागेचा माळी या झाडांना पाणी घालत व खतही घालतो. बागेमध्ये झोपाळे, घसरगुंडी, गोल चक्र, सी सॉं असे वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. त्यावर बसून खेळायला झोके घ्यायला मला खूपच आवडते.
काही लोक चालण्याच्या व्यायामासाठी बागेत येतात. त्यासाठी सिमेंटचा सुंदर रस्ता बांधला आहे त्यावर रंगीबिरंगी फरश्या ही लावले आहेत. येथे छोटेसे तळे आहे यामध्ये रंगीबिरंगी मासे व दोन-तीन कासव आहेत. बागेच्या बाहेर चणे शेंगदाणे मिसळ भेळ विकणारी माणसे बसलेली असतात. आई माझ्यासाठी त्यांच्याकडून भेळ खरेदी करते. तसेच फुग्या वाल्या कडून मोठा फुगा सुद्धा घेते. अशी ही बाग मला खूपच आवडते.