निबंध -'मी पाहिलेली रम्य पहाट'(वर्णनात्मक) या विषयावर निबंध लिहा . *
Answers
Explanation:
पहाटेची वेळ अतिशय प्रसन्न असते .रोमारोमात चैतन्य फुलवणारी. मनाला मोहवणारी अल्हाददायक पहाट दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण करते. विशेषतः पावसाळ्यानंतरच्या काळातील पहाट अधिक चैतन्यमय प्रसन्न असते कारण या पहाटे मध्ये ग्रीष्मातील अंग जाळणारी दाहकता नसते, तसेच वर्षा ऋतु मधील पावसाची संततधारही नसते.
पावसाळा नुकताच संपलेला असतो. या वेळी आकाश निरभ्र होते. पहाट होताच सगळीकडे पसरलेला काळोखाचा पडदा हळूहळू विरळ होत जातो आणि त्या पडद्यामागे घडलेल्या अस्पष्ट गोष्टी हळूहळू दिसू लागतात . त्यांचे अस्तित्व जाणवू लागते. त्याच वेळी आकाशातील पांढऱ्या ढगांची गडबड ही चालू असते . लहान मुलांसारखे एकमेकांना ढकलत प्रत्येक ढग पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो.
स्वच्छ निळे आकाश असते आणि त्यामध्ये पांढऱ्या रंगांची दाटी हे बघून म्हणाला अगदी आल्हाददायक वाटते . एखाद्या कुशल चित्रकाराने सहजपणाने आपल्या कुंचल्यातून चित्र रेखाटावे तसेच सर्वात महान चित्रकार असलेल्या निसर्गाने रेखाटलेले हे चित्र आणि त्यातील रंगसंगती अप्रतिमच असते. साधेपणातील सौंदर्य आपल्या निदर्शनात येते. अशावेळी माझ्या मनात हिंदीतील एक वाक्य सहज आणि सतत येते ते म्हणजे," सादगी मे ही सुंदरता हैं! "
वाऱ्याची मंद शीतल झुळूक अलगद आपल्याला स्पर्श करू लागते. तो स्पर्श म्हणाला मोहून टाकतो. त्या लहरीने मन सुखावून जाते. पहाटेच्या या प्रसन्न शांत वेळेतच आपल्या पूर्वजांना वेद स्फुरले.
हिवाळ्यातील सकाळ मात्र फारच गंमत करून जाते. हिवाळ्यात केलेला व्यायाम आरोग्याच्या दृष्टीने अधिक पोषक असतो. त्यामुळे हिवाळ्यात पहाटे फिरायला आणि व्यायाम करायला जाणाऱ्यांची चांगलीच दांडी उडते. सकाळच्या बोचऱ्या थंडीत बिछान्यातून बाहेर येण्याचे धाडसच होत नाही . आईने पांघरून दिलेल्या किंवा आजीच्या जुन्या साडी पासून बनवलेल्या गोधडी मधली ऊब जगावेगळीच असते. त्यावेळी एका क्षणाला मन म्हणते चला आज व्यायामाला जाऊया, पण अंगावरचे पांघरून काढताच थंडीमुळे पुन्हा अंथरुणात शिरून कधी झोप लागते ते कळतच नाही.