India Languages, asked by TejasviSDalviRSM53BE, 8 months ago

निबंध मराठीत
विषय:- कोरोना एक जागतिक संकट .
या विषयावर 150 शब्दांचे निबंध लिहा.




plz लवकर reply करा
plz लवकर उत्तर द्या ​

Answers

Answered by studay07
43

Answer:

                         कोरोना एक जागतिक संकट    

ह्या पृथ्वी वर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत आणि  अजूनही घडत असतात  

काही दुर्घटना हि घडल्या आहेत . त्या पैकीच एक म्हणजे  कोरोना , २०१९ च्या मध्यापासून चीन मध्य एक नामांकित शहर ऊहन मध्य या विषाणूने जन्म घेतला .

 सुरुवातीला या रोगाचे लक्षणे सामान्य वाटले आणि लवकर लक्षात  परंतु काही कालावधी उलटल्यावर एकाच लक्षणाचे अनेक रुग्ण निदर्शनाला आल्यावर या कडे लक्ष देण्यात आले आणि काही एक्स्पर्ट डॉक्टर्स आणि वैज्ञानिकानी जगाला पहिल्याद धोक्याचा इशारा दिला .  परंतु तो पर्यन्त उशीर झाला होता चीन मधून अनेक लोक बाहेर देशात हि गेले होते आणि हा रोग अनेक मोठं मोठ्या देशांपर्यंत पोहचला होता .  

अनेक मोठमोठ्या देशां मध्य लोकडोवन करण्याचा निर्णय घेतला . या रोगावर काही लस  नसल्यामुळे देशांमधय लॉकडोवन चा निर्णय घेतला , परंतु हा निर्णय कितपत योग्य आहे किंवा होता , ? कारण  अनेक गरीब लोक जे उदरनिर्वाह करण्यासाठी रोज काम करत होते  त्यांचे व्यवसाय बंद झाले. खाण्या - पिण्याचे वांदे झाले . अनेक लोक आपल्या आपल्या ठीकणी   अडकून बसले , हजारो लोक आपल्या आपल्या गावी परतले , बाहेर संसर्गाचा धोका होता आणि बाहेर येण्यासाठी प्रबंध लावले होते .

हजारो च्या संख्येने संसर्ग वाढत होता . अनेक लोकांनी प्राण हि गमावले , देशातील प्रत्यक क्षेत्रावर याचा परिणाम झाला . शाळा , महाविद्यालय , दुकाने सर्व काही बंद झाले . अनेक परीक्षा हि रद्द झाल्या . देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम झाला . हि सर्व परस्थिती सामान्य होण्यासाठी लस आल्यापासून पुढे कमीत कमी १ वर्षाचा कालावधी लागेलं .

आज आपण अनेक प्रबंध पाळून राहावे लागत आहे . आपण आपली जबाबदारी घेतली पाहिजे , आपण आपली  काळजी घेतली पाहिजे , आपण नक्कीच यावर विजयी मिळूवु .

Similar questions