Hindi, asked by tejas1377, 10 months ago

निबंध मराठी दुष्काळ -एक भीषण समस्या . ​

Answers

Answered by shailajavyas
135

Answer: दुष्काळ म्हणजे पावसाची कमतरता.  सरासरीपेक्षा कमी पाऊस होणे किंवा पाऊस न होणे. पावसाच्या वितरणात फरक पडणे, पाण्याची गरज भासणे, पाण्याचा तुटवडा भासणे अशाप्रकारे हवामान बिघडण्याच्या प्रकाराने दुष्काळाशी संबंधित पाणीटंचाई, उपलब्ध पाण्याची कमतरता यासच दुष्काळ असे म्हणतात.  

: दुष्काळ आज आमच्यासामोर एक भीषण समस्या आहे .

Explanation: दुष्काळाचे प्रमुख दोन प्रकार सांगितले जाते आहे. निसर्ग निर्मित दुष्काळ व मानव निर्मित दुष्काळ.

निसर्ग निर्मित दुष्काळ :.  कारण म्हणजेच या एकूण समस्येचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगितले जाते आहे. मानसूनच्या अनियमिततेमुळे दुष्काळ पडण्याच्या बातम्या आपण अगदी बालपणापासून ऐकलेल्या असतात आणि त्यामुळे दुष्काळाचे मुख्य कारण नैसर्गिक आहे, असा एक सर्वसामान्य समज झालेला असतो.

पाणी साठविण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे झाले नाही तर ज्या प्रदेशांमध्ये भरपूर पाऊस पडतो, तेथेसुद्धा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार. चेरापुंजी याचे उत्तम उदाहरण आहे. भारतातील सगळ्यात जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशांपैकी चेरापुंजी एक आहे. मात्र वर्षातील बराचसा काळ त्याला पाण्याच्या समस्येशी झगडावे लागते. वास्तविक, आजसुद्धा जर आपल्याला दुष्काळासारख्या संकटाशी झगडावे लागत असेल, तर त्यासाठी नैसर्गिक कारणे पुढे करणे नक्कीच चुकीचे आहे. १७ व्या किंवा १८ व्या शतकात असे बोलले गेले असते तर गोष्ट वेगळी होती. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके पुढारलेले आहे की कमीत कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशातही पुरेशा पाण्याची तजवीज केली जाऊ शकते. भारतात नद्यांचे इतके विशाल जाळे पसरलेले आहे की देशातील कोरड्याहून कोरड्या क्षेत्रालासुद्धा दुष्काळमुक्त करता येऊ शकते.

दुष्काळाच्या निर्माणामध्ये ग्लोबल वॉर्मिंग एक नैसर्गिक कारण आहे. ग्लोबल तापमानामध्ये फरक पडला तरी ऋतुचक्र बिघडतो. त्यामुळे पुन्हा पावसाचे प्रमाण कमी होते व दुष्काळ सदृष्य परिस्थिती उद्भवते.

मानव निर्मित दुष्काळ :  दुष्काळाच्या निर्माणामध्ये  पाण्याचा जास्त वापर, सदोष सिंचन आणि शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेतील गळत्याची पण मुख्य भूमिका आहे. मानसूनमध्येसुद्धा भारतात इतका पाऊस पडत असतो की त्या पावसाचे योग्य व्यवस्थापन केले तर त्याद्वारे दुष्काळाचा प्रश्न सोडवता येऊ शकेल. नद्यांचे पाणी व्यवस्थित पद्धतीने वापरले आणि त्यासाठी आवश्यक अशी संरचना उभी केली तर हे निश्चितच शक्य आहे. याद्वारे भूमिगत पाण्याची सतत घसरणारी पातळीसुद्धा नियंत्रित केली जाऊ शकते.

सरकार काही योजना लागू करते ज्यांची अंमलबजावणी कधी होत नाही, नंतर सरकारची अकर्मण्यता आणि भ्रष्टाचारापाशी येऊन समस्या थांबते आणि शेवटी थोडीफार नुकसान भरपाई देऊन समस्या सोडवली जाते. या एकूण प्रक्रियेत समस्येची खरी कारणे दडवली जातात आणि या व्यवस्थेचे चारित्र्य लोकांसमोर येऊ शकत नाही.

कोणत्याही समस्येवर उपाय ती समस्या समग्रतेत समजून घेऊनच शोधता येऊ शकतो. दुष्काळाचा प्रश्नसुद्धा आपण या संदर्भातच योग्य प्रकारे समजून घेऊ शकतो.

दुष्काळ हा वर्षांपुरताच सीमित नसतो, तर तो आपल्या खुणा मागे ठेवून जातो.

Similar questions