World Languages, asked by sakshimalpute, 18 days ago

निबंध


शहरी मतदरांची अनास्था कारणे आणि उपाय

Answers

Answered by pradabae
1

Answer:

येत्या जून महिन्यात पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातील एक मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघ हा आहे. पदवीधरांचे प्रतिनिधी राज्याच्या वरिष्ठ सभागृहात जावेत, तेथे त्यांनी पदवीधरांचे प्रश्न मांडावेत यासाठी घटनाकारांनी केलेली ही तरतूद. मात्र पदवीधर मतदारसंघ म्हणजे काय?  या मतदारसंघाचे महत्त्व काय?  या मतदारसंघाच्या निवडणुका कशा होतात? आणि अधिकाधिक पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याची गरज का आहे?  याबद्दल अगदी सुशिक्षितांनाही माहिती  नसते. मुंबईसारख्या एरवी माहितीचा पूर येणाऱ्या शहरातही याबाबतीतले अज्ञान आणि उदासीनता लक्षणीय आहे. त्याचा परिणाम म्हणजे या मतदारसंघात होणारी नाममात्र मतदारनोंदणी आणि त्याहीपेक्षा तुरळक मतदान. या अनास्थेचा काहींना फायदा होत असला तरी सुशिक्षितांचा लोकशाही प्रक्रियेशी संबंध असावा असे आपल्याला वाटत असेल तर हे चित्र फारसे आशादायी नाही.

भारतीय राज्यघटनेच्या १७१ व्या कलमामध्ये विधान परिषदेचा उल्लेख आहे. ज्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे, तेथील विधान परिषदेच्या एकूण संख्येपैकी जवळजवळ एकबारांश सदस्य हे भारताच्या कोणत्याही राज्यातील, कोणत्याही विद्यापीठाचे किमान तीन वर्षे आधी पदवीधर झालेले किंवा विद्यापीठाच्या पदवीधरांशी समकक्ष असलेल्या पदव्या असलेले नागरिक निवडून देतात. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण ७८ सदस्य आहेत. त्यापैकी सात सदस्य पदवीधर मतदारसंघांतून येतात. मुंबई पदवीधर मतदारसंघ हा त्यापैकीच एक मतदारसंघ आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मिळून हा मतदारसंघ तयार होतो. म्हणजे मुंबई शहरासह पश्चिम उपनगरांमध्ये दहिसरपर्यंत, पूर्व उपनगरांमध्ये मुलुंडपर्यंत आणि हार्बर मार्गावर मानखुर्दपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. एवढ्या मोठ्या टापूत विधानसभेचे ३६ मतदारसंघ येतात. मतदारसंघ पदवीधरांचा असला तरीही उमेदवार पदवीधरच असला पाहिजे अशी सक्ती नाही.

पदवीधर मतदारसंघामध्ये शिकल्या सवरलेल्या मंडळींचे मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आणि प्रत्यक्षात मतदानासाठी बाहेर पडण्याचे प्रमाण अत्यल्प असते. या निवडणुका सहा वर्षांतून एकदा होतात. त्यांचे आणि इतर सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जुळत नाही. या निवडणुकांसाठी निवडणुकांची अधिसूचना जाहीर झालेल्या तारखेआधी तीन वर्षे (यंदासाठी १ ऑक्टोबर २०१४) पदवीधर झालेला / झालेली कोणीही व्यक्ती मतदार म्हणून चालते.

सर्वोच्च न्यायालयाने १२ जानेवारी २०१६ रोजी दिलेल्या निर्णयाप्रमाणे या निवडणुकीसाठीची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीत नव्याने करायची आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदार नोंदणीची अधिसूचना २८ सप्टेंबर २०१७ रोजी जाहीर झाली .या अधिसूचनेप्रमाणेच मुंबई पदवीधर मतदारसंघासाठीची मतदार नोंदणी सुरू झाली .सध्या पुरवणी यादीची मतदार नोंदणी सुरू आहे. निवडणुकीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या जाहिरातीनुसार मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणीसाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या निवडणुकीच्या मतदार नोंदणीचा तपशील shorturl.at/dnFI3 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नाव नोंदण्यासाठीचा अर्ज क्र. १८  shorturl.at/ejvxL वर उपलब्ध आहे. सध्या मुंबई शहरात राहणारा, तीन वर्षे आधी (१ ऑक्टोबर २०१४ आधी) पदवी मिळालेला कोणीही पदवीधर मतदार म्हणून पात्र आहे. आपल्याला मिळालेली पदवी, पदविका या पात्रतेत बसते की नाही हे ज्या मतदारांना तपासून पाहायचे असेल त्यांनी  shorturl.at/bpzDJ या दुव्यावर जाऊन तिथे दिलेल्या पदव्यांच्या यादीमधून खातरजमा करून घ्यायची आहे.

मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये विजेत्या उमेदवाराला सरासरी ५० ते ८० हजार मते मिळतात. म्हणजे सर्व विजेत्या मतदारांच्या मतांची बेरीज पंचवीस लाखांहून अधिक होते. मात्र सबंध मुंबईभर पसरलेल्या पदवीधरांच्या मतदारसंघामध्ये २०१२ च्या निवडणुकीमध्ये विजेत्या उमेदवाराला १५ हजारांहून कमी मते मिळाली होती. याचा अर्थ शिकलेला वर्ग या मतदान प्रक्रियेपासून माहितीअभावी किंवा उदासीनतेमुळे कमालीचा दूर आहे.

मतदारयादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने कालमर्यादा घालून दिलेली आहे.मतदार नोंदणी सध्याही चालू आहे. इतर निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने मतदार जागृतीचे कार्यक्रम सातत्याने हाती घेतले जातात तसे या निवडणुकीच्या बाबतीत घडत नाही. अनेक पदवीधरांकडे त्यांची प्रमाणपत्रं नीट ठेवलेली नसतात, किंवा या मतदानाचा अर्ज भरावा यासाठी ती शोधणे त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. त्याचाही परिणाम मतदार नोंदणीवर होतो. एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे ही निवडणूक मतदान यंत्रावर होत नाही, तर मतपत्रिकेवर होते. मतपत्रिकेवर असलेल्या उमेदवारांच्या नावापुढे १,२, ३ असा पसंती क्रम देऊन मतदान करायचे असते.

घटनाकारांनी समाजातल्या शिक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व संसदीय व्यासपीठावर व्हावे यासाठी विचारपूर्वक या मतदारसंघाची रचना केली आहे. मात्र गेली काही वर्षे आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याच्या प्रयत्नांत असलेल्या राजकीय पक्षांनी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त प्रतिनिधींच्या जागांप्रमाणेच पदवीधर मतदारसंघही बळकावून टाकले आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या प्रतिनिधीने मुंबई शहराचे,पदवीधरांचे प्रश्न सोडवायला हवेत.त्यासाठी उत्तरदायी राहायला हवं.मुंबई पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी हा मुंबईचाही प्रतिनिधी आहे. त्यामुळे मुंबई शहराच्या प्रश्नांचा किमान मागोवा घेण्याचा प्रयत्न या उमेदवाराने केला पाहिजे. तसे झाले तरच या मतदारसंघाला न्याय दिल्यासारखं होईल.

Similar questions