India Languages, asked by tinapatil, 20 hours ago

निबंधलेखन-
कोरोना संकट कोरोना महामारी,
उगम, संकटाची व्याप्ती,
दुष्परिणाम,
सुपरिणाम,
काय शिकलो​

Answers

Answered by Jiya0071
11

Explanation:

शहरी जीवनाची आवड, क्रेझ आमची क्षणार्धात कमी झाली. "आपला गाव बरा गड्या' असे म्हणू लागलो. गांधीजींनी "खेड्यांकडे चला' हा संदेश एकेकाळी दिला होता, तो गरजेचा वाटू लागला व अनेकांनी तो अमलात आणला. बाहेर पडायचे नसल्याने घरचे सात्त्विक अन्नच खाऊ लागलो. हॉटेलिंग बंद झाले. त्यामुळे साहजिकच जिभेचे चोचले पुरविणाऱ्या खर्चावर नियंत्रण आले. बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने होणारे आजार बंद झाले. त्यामुळे डॉक्‍टरांकडे दवाखान्यात होणारा खर्चही वाचला. घरातील उपलब्ध साधनसामग्रीवरही जगता येते, याची जाणीव झाली. अनावश्‍यक खरेदीवर आळा बसला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, बरेच जण स्वावलंबन शिकले. घरात पाण्याचा ग्लासदेखील न उचलणारे स्वयंपाकघरात मदत करू लागले. घरात कामवाली बाई नसल्याने सर्व कामे स्वतः करू लागलो. मुलांना घरातील लोकांचे प्रेम व सहवास मिळू लागला. पाळणाघरातून सुटी मिळाली. नात्याचे अर्थ समजू लागले. एकमेकांची काळजी घेऊ लागलो आणि कदर करू लागलो. दूरचित्रवाणीवर सगळीकडेच पौराणिक, आध्यत्मिक, ऐतिहासिक मालिका सुरू झाल्या. त्यामुळे आपली भारतीय संस्कृती काय आहे? हे लहान मुलांना माहिती होऊ लागली, तसेच या इंटरनेटच्या युगातसुद्धा कालबाह्य होत चाललेले बैठेखेळ एक पिढी दुसऱ्या पिढीला शिकवू लागली; त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान सर्वच पिढ्यांतील लोक आत्मसात करू लागले; जसे, की "केजी'पासून महाविद्यालयीन विद्यार्थी "इ-लर्निंग'च्या माध्यमातून शिकू लागले. चांगल्या विचारांची देवाणघेवाणही व्याख्यान, मुलाखत, संवाद हे अनेक "ऍप'द्वारे एकमेकांपर्यंत पोचू लागले.

Similar questions