India Languages, asked by vinayakpn156, 1 month ago

निबंधलेखन : -
माझे आवडते शिक्षक​

Answers

Answered by gangakarkirkt1983
18

Answer:

,

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांना खूप महत्व असते. तसेच त्यांना महत्वाचे स्थान दिले जाते. शिक्षकांना एका देवापेक्षा सर्वात उच्च स्थान दिले जाते. कारण शिक्षक तेच असतात जे मुलांमध्ये विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती विकसित करतात.

आई – वडील हे आपल्या जीवनाचे पहिले गुरु असतात पण त्यानंतर एक शिक्षक हि मुलांना पूर्ण रूपाने घडवण्याचे काम करतात. शिक्षक प्रत्येक मुलाला त्यांचे जीवनाविषयक ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतात.

एक शिक्षका शिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सफल होऊ शकत नाही आणि आपल्या जीवनात यश मिळवू शकत नाही. असे काही शिक्षक आहेत जे मुलांच्या जीवनासाठी आणि प्रेरणा बनतात.

माझे आवडते शिक्षक

माझ्या शाळेत अनेक शिक्षक आहेत. सगळे शिक्षक खूप चांगल्या प्रकारे शिकवतात आणि मला शाळेतील प्रत्येक शिक्षकांविषयी आदर आहे. पण त्या सर्व शिक्षकांपैकी नरेश काळे यांना माझा आदर्श आणि प्रेरणा मानतो.

काळे सर हे सर्वांचेच लाडके आहेत आणि मला पण ते खूप आवडतात. त्यांची शिकवण्याची पद्धत इतर शिक्षकांपेक्षा वेगळी आहे. ते आम्हाला गणित आणि इंग्रजी हा विषय शिकवतात. काळे सर सातवी ते दहावीच्या मुलांना शिकवतात.

जर मुलांना काही येत नसेल आणि समजत नसेल तर त्या मुलांकडे जास्त लक्ष देतात. त्याच मुलांकडून ते मेहनत करून घेतात. परंतु काही सर असे असतात कि मुलांना त्यांना बाहीतल्यावरच भीती वाटते.

पण काळे सरांच्या बाबतीत असे काही नाही आहे. ते सगळ्या बरोबर मिळून – मिसळून राहतात आणि खूप गंमत – जंमत करून शिकवतात. त्यामुळे काळे सर हे सर्वांचे लाडके सर आहेत.

शिकवण्याची पद्धत

काळे सर हे केवळ शिक्षकच नव्हे तर माणूस म्हणीन देखील खूप चांगले आहेत. आमच्या शाळेमध्ये जेव्हा एका विद्यार्थ्याकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा स्वतः त्यांनी त्या मुलाचे पैसे भरले होते.


vinayakpn156: Thank you bro ❤
Answered by nayaknikhil21
5

Answer:

pls mark me as brainliest

Explanation:

                                            माझे आवडते शिक्षक

मला ज्या शिक्षिकेची आवड आहे आणि तिचे सर्वाधिक कौतुक करतो आहे ती श्रीमती xyz आहे.  ती आमची (विषय) शिक्षिका आहे. ती खूप सुंदर आहे. तिची उंची, मोठे डोळे आणि मोठे हृदय आहे. ती परिपूर्ण शिक्षकाचे एक उत्तम उदाहरण आहे. तिचा नेहमीच एक मार्ग असतो.

विद्यार्थ्यांपर्यंत वैयक्तिक पोहोचणे  पातळी जे आश्चर्यकारक आहे. तिचे व्यक्तिमत्त्व वर्गात वातावरण तयार करण्यात मदत करते ज्यामुळे आम्हाला हे समजण्यास मदत होते की ती केवळ एक शिक्षकच नाही तर एक मित्र देखील आहे. म्हणूनच ती माझी आहे . आवडता शिक्षक.

Similar questions