India Languages, asked by nazmasheikh85, 1 day ago

निबंधलेखन (प्रसंगलेखन) विषय : अकस्मात पडलेला पाऊस (मुद्दे : पावसाळ्या पूर्वीचे वातावरण, प्रत्यक्षपावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव, जनजीवनावर झालेला, परिणाम, तुमच्यावर झालेला परिणाम, सृष्टीतील इतर सजीवांवर झालेला परिणाम)​

Answers

Answered by soniya6635
21

मे महिन्याचा कडक उन्हाळा चालू होता अतिशय कडक उन्ह पडले होते. त्यामुळे अतिशय भयंकर उघडत होते. सकाळी सहा वाजल्यापासून अंगातून घामच्या धारा वाहत होते. जसजसा दिवस वर येऊ लागला तसतसा उकाड्याने अधिकच हैराण केले.

 

अशा अवस्थेत मी घरातील पंखे, कुलर लावले परंतु त्यातून अधिकच उष्ण हवा बाहेर येऊ लागली. शरीराला थंडावा मिळावा म्हणून बाहेर जायचा विचार केला तर बाहेर अतिशय उष्ण ऊन असल्याने बाहेर जाणेही शक्य नव्हते. या परिस्थितीमध्ये जीव हैराण झाला होता.

 

तेवढ्यात, भर दुपार ही असतानाही सर्वात्र अंधार पसरला. अचानक ‌सोसाट्याचा वारा सुटला, वादळ सुटले या वादळामध्ये जमिनीवर केलं, पालापाचोळा, कागदाचे तुकडे आकाशामध्ये उंच उडत होते. तेवढ्यात भरा भर ढगांनी संपूर्ण वातावरण भरून आले. प्रकाशात काळोख पसरू लागला आणि ढगांचा कडकडाट होऊन विजा चमकू लागल्या.

 

आणि पाहता पाहता पावसाचे थंडगार मोठ-मोठे थेंब जमिनीवर पडू लागले. जसजसा वारा वाढू लागला तसतसा पावसाचा जोर देखील वाढू लागला.

भर ऊना मध्ये आलेल्या या पावसाला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. अचानक आलेला पाऊस पाहण्यासाठी मी, आई-बाबा दरवाजाच्या आडोशाला थांबून पाहत होतो. पावसाचा जोर चांगलाच होता. सर्वत्र उडणारे धूळ शांत होऊन सर्व रस्त्यांवर पाणी वाहू लागले. पावसाचा जोर एवढा होता की थांबायचे नाव घेईना. घरोघरी, रस्त्यावर, डोंगरदऱ्यातून सर्वत्र पाण्याचे लुटीचे लोटे वाहू लागले.

 

एखाद्या अवखळ आणि दांडगट मुलाप्रमाणे पाऊस पडत होता. उन्हाच्या लाटे पासून शरीराला वाचवण्यासाठी पडणाऱ्या पावसाला पाहून आम्हा मुलांना देखील आनंद झाला. आणि आम्ही मुले सुद्धा पावसाच्या अवखळ पणामध्ये सामील झालो.

 

पावसाच्या धारांमध्ये मनसोक्त नाचू लागलं. खरं म्हणजे ह्या पावसाचा आनंद इतर सर्व पावसापेक्षा खूपच वेगळा होता. इतर वेळेस असा पाऊस पडला तर सर्वजण आपल्या घरामध्ये बसतात परंतु या पावसामध्ये सर्वजण बाहेर येऊन पावसाचा आनंद घेत होते.

 

आम्ही पावसामध्ये शिरलो का पाऊस आमच्या मध्ये शिरला हेच कळत नव्हते. सर्व आजुबाजुचा परिसर सुद्धा पाऊसमय झाला होता. झाडेझुडपे तर शेंड्यापासून मुळापर्यंत पावसात निथळलेले होती.

 

माझ्या आणि माझ्या सर्व मित्र मंडळ यांच्या अंगावरून पावसाचे थेंब सरसर उतरत होते. पावसाच्या या शितल स्पर्शाने जीव सुखावला होता. मन सुद्धा निवांत झाले होते.

 

थोडा वेळ पूर्वी उन्हाच्या लाटेने कडाडलेले मन आता पावसामुळे आनंदित झाले होते. अकस्मात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण वातावरण जलामय आणि शांत झाले होते. कदाचित उन्हापासून बचाव करण्यासाठी हा पाऊस पडला असावा.

 

पावसाने अचानक पणे येऊन हा केवढा मोठा कायापालट केला होता. ही किमया फक्त पाऊसच करू शकतो. आज पडलेला हा पाऊस ईश्वराचा अवतार होता. या अकस्मात पडलेल्या पावसामुळे फक्त मनुष्यच नाही तर सर्व पक्ष सुद्धा सुखावले होते.

 

खरंच! पावसाला ईश्वराचे रूप म्हणणे खोटे ठरणार नाही. कारण एवढ्या उन्हा च्या परिस्थितीमध्ये सर्वांना शीतलता ची गरज होती अशावेळी हा पाऊस पडून सर्वांच्या मनाला शांत करणारा ठरला.

 

त्यामुळे पावसा येवढी निर्मळ आणि मनावर खोल प्रभाव काढणारी शक्ती दुसरी कुठलीही असू शकणार नाही..

Hope it helps you.

Similar questions