History, asked by seemagadhave0870, 3 months ago

(७) नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी' असे कोणी म्हटले आहे ?
(अ)संत ज्ञानेश्वर
(ब) संत तुकाराम (क) संत नामदेव । (ड) संत एकनाथ​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

संत नामदेवांनी 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।' असे म्हटले आहे.

Explanation:

संत नामदेवांनी आपल्या भक्तीच्या जोरावर संपूर्ण राज्यात समाज प्रबोधनाचे काम केले. समाजातील स्पृश्य-अस्पृश्य, गोरगरीब, मागासलेले व बहिष्कृत समजल्या जाणाऱ्या घटकाला मान-सन्मान प्राप्त करून देण्यासाठी, तसेच समाजातील प्रत्येक व्यक्ती हा समान आहे ही भावना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

आपल्या काव्याच्या माध्यमातून आणि कीर्तनातून समाजामध्ये  जनजागृती केली. समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या कीर्तनात गुंतवून त्यांनी ज्ञान वाटपाचे महान कार्य केले. कीर्तन करत असताना नाचून, गाऊन आनंदाने ज्ञानार्जन कसे करता येईल व मिळवलेले ज्ञान समाजासाठी कसे वापरता येईल त्याच्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असत. आपल्या ज्ञानाच्या दिव्याच्या जोरावर समाजात पसरलेला अंधश्रद्धेचा व अज्ञानाचा अंधार कसा दूर करता येईल त्याच्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्न करत होते.

Answered by RajuPandav
0

Answer:

ब

Explanation:

Similar questions