India Languages, asked by srushti0412, 5 months ago

नाचता येईना अंगण वाकडे
अर्थ सांगा ​

Answers

Answered by nniku3673
0

Answer:

please write in English I can't understand

Answered by vedantimore2003
1

Answer:

जेव्हां एखादी गोष्ट,कृृृृृृृृती,विचार,कल्पना असे कांहीही करताना आपल्याला जमत नाही तेव्हां ते का जमले नाही किंवा जमवता आले नाही याला इतरांसमोर कांहीतरी कारण द्यावे लागते. यालाच इंग्रजीत "रॅशनलायझेशन" म्हणतात मराठीत त्याला आपण सबब म्हणतो. सबब ही "फेस सेव्हिंग डिव्हाइस" असते. खरे म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही तेव्हा ते कौशल्य,ती कुवत,ते सामर्थ्य,ती क्षमता आपल्यात पुरेशी ,पर्याप्त नसते किंवा अजिबातच नसते.

पण आपली असमर्थता मोकळेपणे,प्रामाणिकपणे कबूल करण्याचे धैर्य फार थोड्यांमधे असले. त्यात आपला अहंकार,स्व दुखावतो. आत्मप्रतिष्ठा पणाला लागते. म्हणून बहुसंख्य लोक बहुतेक वेळा सबबी च्या कामचलाऊ कुबड्या वापरुन आला प्रसंग निभावून नेतात.

मला नाचता कां नाही येत आहे? तर अंगणच वाकडं आहे ! स्वैपाक का जमत नाही ? तर लाकडं ओली असल्याने नीट पेटत नाहीत म्हणून !

असे हे अहंकार जपण्याचे समर्थन प्रकार आहेत.

Explanation:

hope so helpful for u

Similar questions