Hindi, asked by krishdarji, 6 months ago

नाडीची आत्मकथा मराठी in 10 Sentence.​

Answers

Answered by jay5345
1

Answer:

Hey mate,☺☺☺

Here is your answer...✨✨✨

✔✔✔✔✔✔✔✔✔✔✔✔✔✔

नदीचे आत्मवृत्त, नदीची आत्मकथा, मी नदी बोलतेय – मराठी निबंध, भाषण

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व नातेवाईक उत्तर भारतात फिरण्यासाठी गेलो होतो. ताजमहाल, हृषीकेश आणि अशाच काही पर्यटन स्थळी आम्ही फिरून नंतर गंगोत्री या ठिकाणी सर्वजण गेलो. अशीच गंगेच्या काठावर मी भटकत होते. माझे मन स्थिर होत नव्हते. हृदयामध्ये कुठेतरी हुरहूर लागून राहिली होती. माझा स्वैरसंचार पाहून की काय पण एक हाक माझ्या कानी आली अन मी बावरून इकडे तिकडे पाहिले. पण मला कोणीच दिसेना म्हणून मी भास झाला असावा असे समजून तशीच पुढे चालू लागले. पण त्यानंतर आणखी एकदा हाक माझ्या कानी पडली.

अगं घाबरतेस कशाला? मला ओळखले नाहीस का? किती वेळा माझ्या पात्रात डुंबलीस, हुंदडलीस, आनंद लुटलास तीच मी या आपल्या भारतभूमीची माता, गंगा नदी माझी ओळख विसरलीस का? थांब थोडा वेळ माझी कहाणी ऐक आणि मग विचार कर. माझ्यासोबत तुझा मूल्यवान वेळ व्यतीत कर. माझे थोडे फार सुख दुःख तू समजून घे. माझा जन्म हिमालयाच्या उंच शिखरावर झाला. लहानपणी मी फारच अवखळ होते. कधी एका जागेवर न थांबता मागे पुढे न पाहता एकसारखी हुंदडायचे दगडगोटे झाडेझुडपे यांच्यामधून रस्ता काढत फक्त धावत रहायचे. वाटेतील वेली माझी वाट अडविण्याचा प्रयत्न करत आणि माझ्याशी लपंडावही खेळत पण कुणालाही न सापडता धावत रहायचे.

मला अनेक भाऊ बहिणी येऊन मिळायचे. त्यामुळे माझा वेग वाढतच जात असे. कळसापासून पायथ्यापर्यंत जाताना रस्त्यात अनेक संकटे येत. त्या सर्व संकटांना तोंड देत मी माझे ध्येय गाठत असत. एखाद्या योध्याप्रमाणे मी लढत असत आणि पुढे जात असत. नंतर मात्र वाट चालणे मुश्किल होई कारण सपाट रस्त्यांवर शेते, वने असे अनेक अडथळे पार करणे जिकीरीचे होई. त्यांच्याशी सामना करत माझी स्वारी तशीच आपले घोडे दवडत पुढे चालत असत. पण या सर्व प्रवासामध्ये मला माझ्या बहीण भावंडांनी शेवटपर्यंत खूप साथ दिली. आणि मी मैलोनमैल धावत सर्व गावांना माझे शुद्ध जल वाटत राहिले, सर्वांची तहान भागवत राहिले. त्यावर कित्येक हेक्टर जमिनींना आपले पोट भरून घेतले. सर्व शेते माझ्यामुळेच हिरवीगार दिसू लागली. शहरे अन्नधान्याने संपन्न झाली.

शहरातील कारखान्यात देखील माझा बिन बोभाट वापर होत असे. तसेच कारखान्यातील प्रदूषित रसायन मिश्रित पाणी माझ्या पात्रात सोडले जाऊ लागले आणि मला त्यामुळे खूप काही सहन करावे लागले, माझे पात्र प्रदूषित होत गेले. भगवान शंकराच्या माथ्यावर देखील स्थान मिळवलेली मी आता दूषित बनले. माझ्या पात्रात जगणारे जलचर प्राणी, वनस्पती मरण पावू लागले पण माणसाला याची काहीच चिंता नाही. माणसांना फक्त पाण्याचा निर्धोक वापर करण्याचे तंत्रज्ञान माहिती आहे, त्यामुळे हेच दूषित पाणी ते शुद्ध करून पितात. मग त्यांना दुसऱ्यांची काय फिकीर? लोक आपली जनावरे, कपडे धुवून प्रदूषणात आणखीनच भर टाकत त्यामुळे माझ्यातून अनेक रोगजंतू वाहू लागले व बरेच निष्पाप लोक त्या रोगांना बळी पडू लागले.

मनुष्याला आपल्या बुद्धीचा खूपच अभिमान आहे त्यामुळे जलशुद्धीकरण, तसेच अनेक प्रकल्प वगैरे केले जातात पण तेच प्रदूषण न करता सर्वांना शुद्ध पाण्याचा उपभोग घेऊ दिला तर जलचर तरी सुखाने जगतील पण पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी माझ्या पत्राचे व पाण्याचे प्रदूषण करत आहेत. गणपती विसर्जनासाठी आल्यानंतर तसेच इतर वेळीही निर्माल्य माझ्या प्रवाहामध्ये सोडून देता आणि मला दूषित करता. कचरा सुद्धा तुम्ही माझ्या पात्रात टाकतात. काही जण तर वाहने सुद्धा माझ्या पात्रात धुतात खरं तर मला तुम्ही सर्वचजण खूपच पवित्र मानता पण तुम्हीच माझ्या ह्या पवित्रपणाला डाग लावत आहात.

वाळू व माती माझ्या पात्रातून नेऊन मला कोरडे ठणठणीत करत आहेत. कशी होणार माझी व माझ्या सहवासातील जलचरांची जोपासना? पण हे मनुष्याला केव्हा कळणार, आमच्यावरील हे अन्याय अत्याचार केव्हा थांबणार? आज मनुष्याला सावधान करणे गरजेचे झाले आहे म्हणून मी माझी कथा तुला सांगून माझे मन मोकळे करत आहे. कदाचित यातून तुम्ही काहीतरी मार्ग नक्कीच काढताल आणि आम्ही खरंच पुन्हा एकदा सुखाने जीवन जगू शकू.

तुमच्या या नवीन पिढीने यातून काहीतरी बोध घ्यावा आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात म्हणून माझी ही एक धडपड.

सूचना: जर इथे दिलेले नदीचे आत्मवृत्त, नदीची आत्मकथा, मी नदी बोलतेय या विषयावरील निबंध, भाषण तुम्हाला आवडले असेल तर या पोस्ट ला चांगली रेटिंग द्या. तुमचे मत कंमेंट सेक्शन मध्ये नोंदवू शकता. आम्हाला तुमचे अभिप्राय ऐकायला आवडते, आम्हाला त्यांनी प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.

✔✔✔✔✔✔✔✔✔✔✔✔✔✔

Hope this will help you...⭐⭐⭐

Keep Asking...✌✌✌

❤❤❤ Please mark my answer as Brainliest....❤❤❤

Similar questions