)नागरिकाचे फायदे सविस्तर स्पष्ट करा
Answers
Answer:
.
निरंतर शिक्षण
स्वयं-शिक्षण सुकर होते.
शैक्षणिक खर्च आणि किमती आटोक्यात राहण्यास मदत होते.
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रकल्प(प्रॉजेक्ट) बनवण्याकरिता प्राथमिक माहिती उपलब्ध होते.
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण सबळ संदर्भानिशी एखादे विवेचन करण्याची सवय होते.
विकिपीडियावर लेखन करणार्या विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर शिक्षणात 'प्रबंध कसे लिहावेत' याची पूर्व तयारी होते.
विकिपीडिया लेखन आणि वाचनाने सामान्य ज्ञानात मोलाची भर पडते. स्पर्धा परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना याचा उपयोग होतो.
भाषांतर करण्यात किंवा भाषांतरणे तपासण्यात सहभाग घेतल्यास नवीन भाषा शिकता येतात,शब्दा-शब्दांमधील विविध बारकावे लक्षात येतात, तसेच भाषा शिक्षणावर प्रभूत्व मिळते.
एखाद्या विषयाबद्दल 'समर्थन' करणार्या तसेच 'विरोध' करणार्या मतांशी परिचय होतो, त्या मुळे दृष्टीकोण एकांगी होण्याचे टळते.
टिमवर्कची आणि परस्पर सहकार्याची तसेच इतरांना प्रोत्साहन देण्याची सवय लागते.
एखादा नवीन विषय आल्यास विकिपीडियातील सोप्या भाषेत चटकन तोंडओळख होते व समजण्यास सोपे जाते.
नवीन शहरात किंवा संस्थेत जाण्यापूर्वी त्या शहरांबद्दल किंवा संस्थेबद्दल समतोल माहिती मिळते.
ज्ञानाचा मुक्त उपयोग करता येतो.
वेळ सत्कारणी आणि सकारात्मक कामात व्यतीत होतो.
विकिपीडियात वाचन आणि संपादन म्हणजे मजा असते.
आपणास आवडणार्या तत्वज्ञानाबद्दल आपली आणि इतरांची मते पडताळून पाहता येतात.
आपले गाव,महाविद्यालय इत्यादी बद्दल माहितीत भर पडते.
आपणास माहिती नसलेल्या किंवा त्रोटक माहिती असलेल्या विषयावर पण लेख सुरू करता येतो आणि इतर लोक त्या बद्दल काय माहिती भरत आहेत ते बघता येते
गरजू जिज्ञासूंना सहाय्य देता येते.
येथे ज्ञान देतांना आणि घेताना बंधने कमीतकमी आहेत.
सॉफ्टवेअर सहीत प्रत्येक गोष्ट स्व्तःची स्वतःस बनवता येते.
मिडियाविकी सॉफ्टवेअर विकिपीडिया शिवाय वैयक्तीक किंवा संस्थेच्या कामाकरिता विनामूल्य वापरता येते.
हे सॉफ्टवर वापरून सहकारी/शासकीय संस्थेचे संकेतस्थळ(वेबसाईट) बनवल्यास कमीत कमी खर्चात त्याचे सुचालन(मेंटेन) होते आणि लोकशाही आणि सहकारी मूल्यांचे जतन होते.
सभोवतालच्या मानवी समाजाला आणि मूल्यांना अधीक चांगले समजावून घेता येते व समजावताही येते.