Geography, asked by madhubajaj432, 3 months ago

नागरिक की करना चे फायदे व समस्या फरक स्पष्ट करा​

Answers

Answered by mohitwagh
3

Answer:

सामाजिक परिवर्तन( सोशल चेंज ). सामाजिक संरचनेत फेरबदल घडविणारी प्रक्रिया. मानवांचे रीतिरिवाज, आचार–विचार, संस्था, संघटना, जीवनपद्घती, भोवतालचा परिसर, व्यक्तिव्यक्तींमधील वर्तन यांमध्ये सतत बदल होत असतात. आदिम अवस्थेपासून ते सांप्रत काळापर्यंत मानवी समाजाच्या सर्व अवस्थांमध्ये सतत परिवर्तन झाल्याचे दिसते.

मॅकायव्हर यांच्या मते सामाजिक संबंधांतील परिवर्तनाला सामाजिक परिवर्तन म्हणता येईल.मूलभूत अर्थाने समाजरचनेतील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ हॅरी जॉन्सन यांच्या मते हे परिवर्तन जैविक, सांस्कृतिक, आर्थिक, तांत्रिक आणि राजकीय क्षेत्रांतही घडून येते.

समाजातील कोणताही बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन नव्हे; तर सामाजिक कृतींचे व आंतरक्रियांचे आकृतिबंध, मूल्ये,सांस्कृतिक फलिते आणि प्रतीके या आविष्कारांसह होणाऱ्या बदलांना सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. समाजाच्या, विविध भागांच्या परस्परसंबंधांच्या स्वरुपात बदल झाला की, समाजरचनेत परिवर्तन घडून येते. पर्यायाने सामाजिक परिवर्तन घडून येते.

संकलित (क्यूम्युलेटिव्ह) सामाजिक बदलांमुळे मानवी सामाजिक इतिहासाची घडण झाली आहे. जनसांख्यिकीय संक्रमण किंवा एखाद्या नवराज्याची निर्मिती यांसारखे महत्त्वाचे बदल, ही पायाभूत परिवर्तने होत. अन्य इतर तुलनात्मक बदल सामान्य होत. संकलित सामाजिक परिवर्तनवादी समाजशास्त्रज्ञ असा प्रश्न उपस्थित करतात की, व्युत्कांतिनिष्ठ स्पष्टीकरण सर्व महत्त्वाच्या संक्र मणांना देता येणार नाही. संकलित सामाजिक परिवर्तने सर्व सामाजिक जीवनातील वैश्विक, प्रक्रियात्मक गुणविशेषांहून वेगळी करावी लागतील. समाजशास्त्रज्ञ प्रामुख्याने प्रक्रियात्मक सामाजिक वर्तनाचा अभ्यास करतात. उदा., सर्व प्रकारचे आकृतिबंध सापेक्षतः स्थिर असूनही सामाजिक जीवनातील विशिष्ट अभिलक्षणे कशी बदलू शकतात, या गतिशील प्रक्रियांवर ते लक्ष केंद्रित करतात. सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनासाठी समाजातील व्यक्तींनी त्यांचे कौटुंबिक, सांस्कृतिक आणि दैनंदिन व्यवहार बदलले. नव्या मूल्यांचे शिक्षण देण्यास सुरू वात केली. कल्याणकारी योजनांतूनही तळागाळातील माणसांच्या उदयाचे लक्ष्य महत्त्वाचे मानले. जो कसेल त्याची जमीन झाली आणि औद्योगिक धोरण ठरविताना कामगार संघटनांना सहभागी करून घेण्यात आले. तसेच राज्यसंस्थेत एकाधिकारशाहीऐवजी लोकशाही प्रस्थापित झाली. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला समाजवादी लोकशाही वा साम्यवादी अर्थव्यवस्था हे पर्याय पुढे आले.परंपरागत अवजारांऐवजी यंत्रांचा वापर होऊ लागला. सतीची प्रथा, बहुपत्नीत्व रद्द होऊन एकऐपत्नीत्वाचा कायदा झाला. हे सर्व बदल समाजव्यवस्थेत दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणण्यास प्रेरक ठरले. सामाजिक परिवर्तन हे पुरोगामी किंवा प्रतिगामी, वर्धमान किंवा ऱ्हासमान, स्थायी किंवा अस्थायी, कायमचे किंवा हंगामी, योजनापूर्वक किंवा योजनाविरहित,एकदिशावर्ती किंवा बहुदिशावर्ती, उपकारक किंवा अपकारक, हितकारक किंवा हानीकारक अशा कोणत्याही प्रकारचे असू शकते.

Answered by itzbangtanarmy7
4

Answer:

१.४ शैक्षणिक समाजशास्त्र व शिक्षणाचे ... आजच्या समस्या आहेत. ... १) शिक्षणाची कार्ये स्पष्ट करा.

Answered by itzbangtanarmy7
4

Answer:

१.४ शैक्षणिक समाजशास्त्र व शिक्षणाचे ... आजच्या समस्या आहेत. ... १) शिक्षणाची कार्ये स्पष्ट करा.

Similar questions