India Languages, asked by Pranav017, 11 months ago

नागरिक म्हणजे काय ? please answer

Answers

Answered by gadakhsanket
95

नमस्कार प्रणव,

★ नागरिक -

  • नागरिक म्हणजे एखाद्या प्रदेशाचा (साधारणतः देश, शहर, खंड) रहिवासी.
  • उदाहरणार्थ - भारत देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारत देशाचा नागरिक म्हणतात.
  • नागरिकत्व म्हणजे लोकांना विशिष्ट प्रदेशात मिळालेला राजकीय दर्जा.
  • नागरिकांना त्या विशिष्ट प्रदेशात कायदेशीर पद्धतीने राहण्याचा संपुर्ण अधिकार असतो.
  • प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत हक्क आणि कर्तव्ये असतात.
  • प्रत्येक नागरिक हा त्या प्रदेशातील शासनसंस्थेचा सदस्य असतो.

धन्यवाद...

Answered by kritiraj018
13

Answer:

नागरिकत्व ही वरवर पाहता अगदी साधी आणि सरळसोट दिसणारी संकल्पना असली तरी अनेक कारणांमुळे राजकीय व्यवहारात आणि राजकीय सिद्धांतामध्ये सुद्धा ती गुंतागुंतीची आणि कधीकधी वादग्रस्त बनलेली दिसते. एखाद्या राजकीय समुदायाचे सभासद असणे असा नागरिक असण्याचा ढोबळ अर्थ सांगता येईल. पण जागतिकीकरणाला आलेल्या गतीमुळे आणि लोक एकाच वेळी अनेक ठिकाणी राहू लागल्यामुळे किंवा अनेक ठिकाणांबद्दल लोकांना एकाच वेळी आत्मीयता वाटू लागल्यामुळे 1980 नंतरच्या काळात नागरिकत्व आणि विशिष्ट राजकीय समुदाय यांचे संबंध खरोखरीच किती महत्त्वाचे आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातो. यातून, देशाच्या नागरिकत्वापेक्षा वैश्विक नागरिक असणे ही कल्पना प्रचलित झाली आहे.

Explanation:

please follow me

Similar questions