नेहमी वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशके आणि खते यांचा एक तक्ता तयार करा .त्याचे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम लिहा
Answers
Answer:कीटकनाशके : मानव व प्राणी यांना होणाऱ्या काही रोगांच्या जंतूंचा प्रसार करणाऱ्या तसेच शेतातील पिके, साठविलेले अन्नधान्य, कपडे, लाकूड इ. जीवनावश्यक साहित्याचा नाश करणाऱ्या कीटकांचा नाश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांना कीटकनाशके असे म्हणतात. उपद्रवी कीटकांचा नाश करण्याच्या पद्धती फार प्राचीन काळापासून माहीत आहेत, पण मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर करून कीटकांचा नाश करण्याचे प्रयत्न हे अलीकडच्या काळातील आहेत. आर्सेनिकाचा कीटकनाशक म्हणून उपयोग करीत असत, असा उल्लेख प्लिनी (इ.स.७०) यांनी आपल्या लिखाणात केलेला आहे. गंधक जाळून त्याच्या धुराने कीटक नाहीसे होतात असा उल्लेख होमर यांच्या ग्रंथात सापडतो. रोमन लोक कीटकनाशासाठी हेलेबोअर (व्हेराट्रम, वंश हेलेबोरस) या वनस्पतीच्या मूलक्षोडाचे (हळदीच्या गड्ड्यासारख्या खोडाचे) चूर्ण वापरत. सोळाव्या शतकाच्या अखेरीस चिनी लोकांनी आर्सेनिक सल्फाइडाचा उपयोग कीटकनाशक म्हणून केला. त्याच सुमारास अमेरिकेत स्पॅनिश लोक सबदिल्ला या रसायनाचा उपयोग उवानाशक म्हणून करीत असत, असा उल्लेख आढळतो.
भारतात. प्राचीन काळी प्राणी व कीटक यांच्या नाशासाठी विषाचा उपयोग करीत असत असे उल्लेख मनुस्मृति, कौटिलीय अर्थशास्त्र, सुश्रुतसंहिता इ. प्राचीन ग्रंथांत मिळतात. ऊद, धूप इत्यादींच्या धुरामुळे कीटकांचा त्रास कमी होतो असे आढळून आल्याने धार्मिक बाबींइतकाच कीटकनाशासाठीही त्यांचा उपयोग करीत असत.
वर्गीकरण : नाश करण्याच्या प्रकारानुसार कीटकनाशकांचे वर्गीकरण केले जाते. या वर्गीकरणावरून एखाद्या कीटकनाशकाचा उपयोग कसा करावा हेही समजते. कीटकांच्या त्वचेशी संबंध येऊन, त्यांच्या पोटात भिनून, श्वासमार्गाने शरीरात जाऊन, शारीरिक वा रासायनिक जीवनावश्यक क्रिया बंद होऊन, प्रजोत्पादनक्षमता नष्ट करून इ. प्रकारांपैकी एका वा अधिक प्रकारे ती कीटकनाशाचे कार्य करतात. या प्रकारांनुसार त्यांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते : (१) पोटात भिनून नाश करणारी, (२) स्पर्शजन्य, (३) दैहिक, (४) धूम्रकारी, (५) प्रलोभक (ॲट्रॅक्टंट), (६) प्रतिवारक (दूर घालविणारी, रिपेलंट).
Hope it helps u keep smiling :)
Explanation:
Answer:
त्यानुसार कीटकनाशकांचा अति वापर करणारे शेतकऱ्यांवर मानसिक नैराश्याचे संकट असून त्याचे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या मेंदूवर होत आहेत. यातून स्वमग्नता (पार्किसन)आणि मेंदूशी निगडीत गंभीर आजारांना निमंत्रण मिळत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
Explanation:
त्यानुसार कीटकनाशकांचा अति वापर करणारे शेतकऱ्यांवर मानसिक नैराश्याचे संकट असून त्याचे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या मेंदूवर होत आहेत. यातून स्वमग्नता (पार्किसन)आणि मेंदूशी निगडीत गंभीर आजारांना निमंत्रण मिळत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.