World Languages, asked by ghorpadeekta0, 6 months ago

नेहरू आत्मचरित्र‌‌ निबंध मराठी

Answers

Answered by shruti831237
0

Answer:

u search on Google also dear u can get that

Answered by crlakshita
0

Explanation:

नेहरूंचे विरोधक अनेक प्रकारचे आहेत आणि होतेही. नेहरू एका बाबतीत सुदैवी होते की त्यांच्या हयातीत त्यांना चांगले टीकाकार भेटले. राम मनोहर लोहिया एकदा म्हणाले की, नेहरू एवढे चांगले साहित्यिक वा लेखक आहेत की खरेतर त्यांनी अजून लेखन करायला हवे होते. पण त्यासाठी त्यांना पुन्हा तुरूंगात टाकावं लागेल म्हणजे भारतीयांना अधिक चांगलं साहित्य वाचायला मिळेल ! यात नेहरूंच्या साहित्यशैलीचे कौतुकही आहे आणि राजकीय उद्देशही होता !नेहरू राजकारणी नसते तर ते नक्कीच इंग्रजी भाषेत लिहिणारे जगप्रसिद्ध असे लेखक झाले असते, असे मत प्रख्यात साहित्यिक रस्किन बॉंड आणि मुल्कराज आनंद यांनी व्यक्त केले होते.मध्यंतरी एकदा ‘कोटेशन्स’ चे पुस्तक वाचत होतो. त्यात अनेक प्राचीन भारतीय आणि ग्रीक, युरोपियन विचारवंतांचे विचार अभ्यासायला मिळाले. आधुनिक कालखंडातील अनेक साहित्यिक, लेखक विचारवंताचे आणि काही राजकीय नेत्यांचे विचार त्यात नमूद केले होते. भारतातील अनेक विचारवंत, तत्वचिंतक यांचेही विचारधन त्यात होते. मात्र राजकीय व्यक्ती असूनही ज्यांच्या विचारांचा समावेश केला होता , अशात भारतीय म्हटले तर दोनच नेते पाहायला मिळाले, ते म्हणजे गांधी आणि दुसरे नेहरू!भारतातील इतर नेत्यांचे ‘कोटेशन्स’ तेवढ्या प्रमाणात इंग्रजी भाषेत आढळून येत नाही, याचं कारण कदाचित इतर नेत्यांचे इंग्रजी भाषेत लेखन नसेल, किंवा असलेच तर ते जागतिक स्तरावर पोचलं नसेल किंवा ते मोजकं लेखन असेल. जागतिक स्तरावर वितरण असणाऱ्या प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित होणे, याचाही फरक पडतो. याचे वर्णन रशियन कादंबरीकार इलिया इरेनबर्ग करताना म्हणतात, ‘Nehru succeded in giving India some features of Europian Culture without abandoning the wealth of national traditions. one can speak about politician’s successes and failures, but I would like to say that, morals principles and conscience permeate the whole life of Nehru.’इंग्रजी साहित्यातील नामवंत साहित्यिक मुल्क राज आनंद, नेहरूंच्या साहित्याविषयी लिहितात “ The phenomenon of an Indian, born in an exalted nineteenth century Europeanized household, educated in England, becoming an Indian Writer of the highest excellence in the English language is strange and inexplicable’. इतिहासकार अर्नौल्ड टॉयन्बी नेहरूंबद्दल लिहितात ‘ When a noble soul takes on itself the burdon of political leadership for politics are always in need of redeeming’ पण नेहरूंनी हे दोन्ही बाजूंवर यशस्वीपणे केलं. राजकीय व्यासपीठ आणि सुधारणावाद याची अवघड सांगड त्यांनी यशस्वी केली.मुल्क राज आनंद यांच्या म्हणण्यानुसार नेहरूंच्या लेखनात टॉल्स्टॅाय, दातोवस्की आणि गांधीजी यांच्याप्रमाणेच तत्वचिंतन, आत्मकथन, निरीक्षण आणि संवेदनशीलता यांचा अपूर्व संगम आढळतो. अर्नोल्ड टॉयन्बी यांनीही नेहरूंच्या या इंग्रजी भाषेमुळे आणि लेखनशैलीमुळे त्यांची लोकप्रियता साहित्यिक क्षेत्रात एक प्रतिभावान लेखक आणि तत्वज्ञ राजकारणी म्हणून असल्याचे म्हटले आहे.आईनस्टाईन यांनी नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी इंडिया’ या पुस्तकाचे वर्णन ‘ – gives an understanding of glorious intellectual and spiritual tradition of a great country’ असे केले. शिवाय नेहरूंबद्दल ते म्हणाले ‘ We the worshipers of science are today looking upto Nehru – for leadership in mankind’s resolute stand to the implications of atomic war’

Similar questions