नेहरू भारताचा शोध आत्मचरित्र निबंध मराठी
Answers
Answer:
Explanation:
आत्मचरित्र हे आत्मशोधाचे प्रकटीकरण असते मात्र नेहरूंच्या आत्मशोधाचे मुख्य माध्यम इतिहास हे आहे. ज्यात त्यांनी प्राचीन भारताचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा आणि त्यातील मानवी जीवनाचे महत्त्व मांडत आपला, आपल्या देशाचा आणि जगाचा शोध घेतला.
पं. नेहरूंचे विरोधक अनेक प्रकारचे आहेत आणि होतेही. नेहरू एका बाबतीत सुदैवी होते की त्यांच्या हयातीत त्यांना चांगले टीकाकार भेटले. राम मनोहर लोहिया एकदा म्हणाले की, नेहरू एवढे चांगले साहित्यिक वा लेखक आहेत की खरेतर त्यांनी अजून लेखन करायला हवे होते. पण त्यासाठी त्यांना पुन्हा तुरूंगात टाकावं लागेल म्हणजे भारतीयांना अधिक चांगलं साहित्य वाचायला मिळेल ! यात नेहरूंच्या साहित्यशैलीचे कौतुकही आहे आणि राजकीय उद्देशही होता !
नेहरू राजकारणी नसते तर ते नक्कीच इंग्रजी भाषेत लिहिणारे जगप्रसिद्ध असे लेखक झाले असते, असे मत प्रख्यात साहित्यिक रस्किन बॉंड आणि मुल्कराज आनंद यांनी व्यक्त केले होते.
मध्यंतरी एकदा ‘कोटेशन्स’ चे पुस्तक वाचत होतो. त्यात अनेक प्राचीन भारतीय आणि ग्रीक, युरोपियन विचारवंतांचे विचार अभ्यासायला मिळाले. आधुनिक कालखंडातील अनेक साहित्यिक, लेखक विचारवंताचे आणि काही राजकीय नेत्यांचे विचार त्यात नमूद केले होते. भारतातील अनेक विचारवंत, तत्वचिंतक यांचेही विचारधन त्यात होते. मात्र राजकीय व्यक्ती असूनही ज्यांच्या विचारांचा समावेश केला होता , अशात भारतीय म्हटले तर दोनच नेते पाहायला मिळाले, ते म्हणजे गांधी आणि दुसरे नेहरू!
भारतातील इतर नेत्यांचे ‘कोटेशन्स’ तेवढ्या प्रमाणात इंग्रजी भाषेत आढळून येत नाही, याचं कारण कदाचित इतर नेत्यांचे इंग्रजी भाषेत लेखन नसेल, किंवा असलेच तर ते जागतिक स्तरावर पोचलं नसेल किंवा ते मोजकं लेखन असेल. जागतिक स्तरावर वितरण असणाऱ्या प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित होणे, याचाही फरक पडतो. नेहरूंची सर्वच पुस्तके आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी प्रकाशित केली. याचा अर्थ असाही की त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनापूर्वीच त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता अशी झाली होती.
१९वे शतक हे जगभर पसरलेल्या साम्राज्यशाहीच्या विस्ताराचे शतक होते. मात्र याच शतकाच्या उत्तरार्धात विविध वसाहतीत स्वातंत्र्य आंदोलनास सुरुवात झाली. याच कालखंडात आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला जगाच्या पाठीवर अनेक देशात त्यात त्या देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, प्रचंड लोकप्रियता लाभलेले अनेक नेते तयार झाले. म्यानमारमध्ये ऑंग सान, चीनमध्ये चैंग कै शेक, श्रीलंकेत बंदरनायके अगदी त्याच प्रमाणे अरब देशात, काही आफ्रिकन देशातही नेल्सन मंडेला वगैरे अनेक नेते निर्माण झाले ज्यांनी चळवळीत, आंदोलनातही भाग घेतला, कारावासही भोगला, लोकप्रियताही मिळवली, यशस्वी राजकारणही केले आणि तत्वचिंतनपर लेखनही केले. पण हे सर्व नेते सर्व पातळ्यांवर काम करू शकले नाहीत. काही लेखक होते पण चळवळीत नव्हते, कोणी तत्वचिंतनपर लेखन केले पण ते लोकप्रिय व यशस्वी राजकारणी होऊ शकले नाहीत.परंतु जवाहरलाल नेहरूंनी मात्र यशस्वी राजकारणासोबतच लेखन केले आणि त्यांचे संशोधनात्मक न राहता त्यास साहित्यिक मूल्य लाभले आणि त्यातून त्यांची ओळख एक साहित्यिक राजकारणी अशी निर्माण झाली.
नेहरूंनी स्वतःला कधीही इतिहास संशोधक म्हटले नाही मात्र ते अभ्यासक होते आणि त्या अध्ययनातून आणि निरीक्षणातून त्यांनी लेखन केले, ज्याचा मुख्य आधार त्यांची मानवकेंद्री चिंतनाची बैठक आणि संवेदनशीलता आहे. आश्चर्य वाटेल, पण नेहरू समीक्षक देखील आहेत. अनेक नामवंत लेखकांच्या, साहित्यिकांच्या पुस्तकांचे परीक्षण आणि काही पुस्तकाच्या प्रस्तावना त्यांनी लिहिल्या आहेत.अनेक वेळी ‘Forworded by J.Nehru’ अशा स्वरूपात पुस्तकांची जाहिरात केली जात असे. व्हिक्टर वॅलेसच्या ‘Path Of Peace’ या पुस्तकाची प्रस्तावना खास त्यांच्या आग्रहावरून नेहरूंनी लिहिली होती.
अमेरिकी लेखिका डोरोथी नॉर्मन यांनी नेहरूंचा एक किस्सा सांगितला आहे. ‘The Good Earth’ या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखक पर्ल बक यांनी नेहरूंच्या स्वागतासाठी न्यू यॉर्कमध्ये एक मेजवानी आयोजित केली होती. त्या मेजवानीची निमंत्रितांची यादी पाहून नेहरू नाराजीने म्हणाले की, या यादीत असेच जुने लेखक आहेत, ज्यांचे लेखन मी वाचलं आहे, वा ज्यांना मी ओळखून आहे पण यात कोणीही तरूण, प्रोग्रेसिव्ह लेखक, संपादक वा प्रकाशक दिसून येत नाही.
व्यासंग व्यापक असल्यामुळे विषयांचे बंधन नेहरूंना कधीच नव्हते, इतिहास, वर्तमान, जागतिक आणि राष्ट्रीय राजकारण, सामाजिक चळवळी, धर्मचिंतन व विवेकवाद, काव्य, नाट्य यावर ते लिहीत व बोलत असत. वेद,उपनिषद, वेदांतापासून ते कालिदासाच्या संस्कृत काव्यापर्यंत आणि सिग्मंड फ्राईडच्या ‘इडिपस कॉम्प्लेक्स’ मानसशास्त्रीय संकल्पनेपासून निशस्त्रीकरणापर्यंत त्यांचे चिंतन, मनन आणि लेखन सतत चालू असे.
व्यापक चिंतन, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि आधुनिक पाश्चात्य विचासरणी यातून त्यांनी स्वीकारलेला आधुनिक राजकारणाचा विचार अशी नेहरूंच्या व्यक्तिमत्वाची मुख्य ओळख आहे. ती त्यांच्या साहित्यात दिसते. नेहरू आणि गांधीजी यांची भेट झाली नसती तर नेहरूंचा दृष्टीकोन निव्वळ पाश्चात्य राहिला असता. मग फार फार तर नेहरू ‘ग्लिम्प्सेस’ लिहू शकले असते आणि त्यांचे आत्मचरित्रही निव्वळ युरोपातील अनुभवाची मांडणी एवढेच राहिले असते.
Answer:
वैयक्तिक आयुष्य संपादन करा
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.
राजकीय आयुष्य संपादन करा
जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले.
१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर कॉंग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय कॉंग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय कॉंग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.
१९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकालीन पण शेवटची ठरली. एकंदर पंडित नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.