निजामशहाचा वजीर कोण होता?
(1)मलिक अंबर.
(2)अफजलखान.
(3)औरंगजेब.
(4)shaisthakhan.
Answers
अफजलखान
shaisthakhan
aurnzeb
Answer:
मलिक अंबर
Explanation:
निजामशाहीतील अतिशय कर्तबगार, मुत्सद्दी व पराक्रमी व्यक्तिमत्व. निजामशाहीत आल्यानंतर त्याने मोगलांना प्रतिकार केला. चांदबिबीच्या खुनानंतर मोगलांनी डाव साधून अहमदनगर ताब्यात घेतले आणि बहादुरशहाला बंदी करून ग्वाल्हेरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते. त्यावेळेस मलिक अंबरने बीदर याठिकाणी मोगलांना त्रास देण्यास सुरुवात केली व बीदर ताब्यात घेतले. नंतर शत्रूच्या ताब्यात गेलेले मुलुख निजामशाहीतील सरदारांना हाताशी घेऊन परत मिळवले.
मोगलांपासून व शत्रूंपासून निजामशाहीचे संरक्षण करणे हे कार्य मलिक अंबर चे होते. राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. मलिक अंबरने निजामशाहीचा राज्य विस्तार वाढवला व प्रशासन व्यवस्था पूर्णपणे कार्यक्षम केली. मलिक अंबरची लोकहितवादी व कर्तबगार प्रशासक म्हणूनही ओळख आहे. हुशार, चाणाक्ष, मुत्सद्दी असा शूर योद्धा म्हणून त्याची ओळख आहे.